QR Code म्हणजे काय? | QR Code in Marathi

QR Code म्हणजे काय

मित्रांनो मागील पोस्ट मध्ये आपण Unified Payment Interface म्हणजेच UPI या बद्दल सविस्तर माहिती बघितलीच आहे, त्याचबरोबर या मध्ये होणाऱ्या बँकिंग व्यवहार पद्धती हि खूप विकसित झालेली आहे, त्यामुळेच हल्ली कागदी पैसे जास्त पाहावयास मिळत नाही याचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन व्यवहार होय. कारण हे ऑनलाईन व्यवहार वापरण्यास सोपे व सुलभ आहे.

अशेच ऑनलाइन व्यवहार करत असाल तर या तंत्रज्ञानाची म्हणजेच QR कोड ची ओळख तुम्हाला असेलच. अनेक वेळा आपण खरेदी केल्यानंतर त्या दुकानावर QR कोड असतो तो स्कॅन करतो व त्यावर पैसे ट्रान्सफर करतो. तर चला QR Code म्हणजे काय? व याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. 

क्यूआर कोड म्हणजे काय? | QR Code Meaning in Marathi 

QR Code चा संक्षिप्त अर्थ Quick Response Code असा होतो, हा Code दिसण्यास हा काळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या चौकोनांनी तयार केलेली एक आकृती असते. जसे कि आपण पुढील इमेजेस मध्ये पाहू शकता. 

QR CODE MARATHI

QR कोड हा एक बारकोड चा प्रकार आहे, आणि संपूर्ण जगात या QR Code चा वापर केला जातो. बारकोड आणि पेक्षा क्यू आर कोड हा अतिशय उपयुक्त आणि वेगवान देखील असतो. 

क्यूआर कोड तयार करण्यासाठी त्यामध्ये जी माहिती द्यावी लागते, त्या माहितीमध्ये अंक, इंग्रजी अक्षरे व चिन्हे या सर्व गोष्टींचा उपयोग केला जातो. तसेच आपल्याला कोणत्या कारणासाठी क्यू आर कोड हवा आहे त्या विशिष्ट कारणासाठी आपण हवा तसा क्यू आर कोड बनवून घेऊ शकतो.


क्यू आर कोड चा इतिहास | History of QR Code in Marathi

मित्रांनो गरज ही शोधाची जननी आहे हि म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल, याच म्हणी प्रमाणे पूर्वी काही माहिती चिन्हांकित करायला बारकोड चा वापर केला जात होता, मात्र या बारकोड वापरावर काही मर्यादा असल्यामुळे जसे कि हा बारकोड स्कॅन करण्यासाठी विशिष्ट्य प्रकारच्या बारकोड स्कॅनर ची गरज भासत होती. 

पण नंतर यावर उपाय म्हणून डेंसो वेव्ह या जपानी कंपनी ने सर्वप्रथम वाहनांना ट्रॅक करण्यासाठी QR Code ची निर्मिती केली, व त्याआधारे वाहनांना ट्रॅक करणे अत्यंत सुलभ झाले आणि नंतर या कोड ची विशेषतः पाहता हा QR कोड संपूर्ण जगभर पसरला. तसेच आता हा QR कोड एवढा विकसित झाला आहे कि या मध्ये विविध प्रकारची माहिती स्कॅन केली जाते, आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन पेयमेन्ट करण्यासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

हे पण वाचा – ऑनलाईन बँकिंग बद्दल संपूर्ण माहिती वाचा


QR Code कोड चे प्रकार  | Type of QR Code in Marathi

कुठल्याही गोष्टीचे संशोधन झाले आणि ती बाजारात सर्वसामान्य झाली की त्या वस्तूंचे प्रकार आपोआपच तयार होत असतात. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार त्या गोष्टीची हाताळणी किंवा आखणी करत असतो. त्याच प्रकारे क्यू आर कोड चे देखील दोन प्रकार पडतात.

  1. स्टॅटिक क्यू आर कोड | Static QR Code

स्टॅटिक कोड चा वापर हा एखादी सूचना किंवा माहिती सार्वजनिक रित्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. या QR कोड मध्ये वर्तमानपत्रे, वेबसाईट, सोशल मीडिया, टीव्ही, पोस्टर्स किंवा ई मेल आणि इतरही खूप प्रकारची माहिती प्रसारित केल्या जाते, तसेच हा QR सामान्य उपयोगासाठी वापरल्या जातो आणि यामधून मर्यादित माहितीच प्रदान केली जाते.

  1. डायनामिक क्यू आर कोड | Dynamic QR Code

हा क्यू आर स्टॅटिक क्यू आर कोड पेक्षा काहीसा अधिक उपयुक्त असतो. हा एक आधुनिक प्रकारचा क्यू आर कोड आहे. या कोडने आपल्याला भरपूर माहिती मिळते. तसेच हा एक लाईव्ह स्वरूपातला क्यूआर कोड असतो. 


QR कोड कसा बनवायचा | How to Make QR Code in Marathi

आपण वेबसाईट, ई मेल आय डी, मॅसेज, इमेजेस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतरही विविध प्रकारच्या गोष्टींसाठी QR Code Generate करू शकतो. तर चला QR Code तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या स्टेप्स चे अनुसरण करूया. 

  • सर्वात आधी तुम्ही QR Code Generator हि वेबसाईट ओपन करून घ्या. 
  • आता या होम पेज वर दिलेल्या विविध पर्याय पैकी तुम्हाला कोणत्या गोष्टी साठी कोड बनवायचा आहे हे सिलेक्ट करून घ्या. जसे कि, वेबसाईट साठी कोड बनवायचा असेल तर URL हा पर्याय सिलेक्ट करा किंवा मेल आयडी साठी तयार करायचा असेल तर ई-मेल निवडून घ्यावे. 
QR CODE GENERATOR
  • जर तुम्ही वेबसाईट URL सिलेक्ट केले असेल तर पुढील प्रमाणे तुम्हाला वेबसाईट URL ऍड करण्यासाठी ची एक विंडो ओपन होईल आणि यामध्ये वेबसाईट ची URL ऍड करा. 
generate qr code
  • यानंतर Generate QR Code यावर क्लिक करावे, तुमचा QR Code तयार झाला असेल. तसेच या QR ला स्कॅन केल्यानंतर वेबसाईट ची माहिती मिळते आणि ती वेबसाईट ओपन होते. त्याचप्रकारे तुम्ही हा Code डाउनलोड देखील करू शकता.

अश्या प्रकारे आपण विविध QR Code ची निर्मिती करू शकतो आणि आपल्या वेबसाईट, ई-मेल आयडी किंवा इतरही माहिती प्रदान करण्यासाठी याचा वापर करू शकतो. 


QR Code चा उपयोग | Uses of QR Code

आज क्यू आर कोड आपल्या आयुष्याचा इतका अविभाज्य घटक बनला आहे की, अगदी लहान मुलांनाही क्यू आर म्हणजे काय? हे सांगावे लागत नाही. रोजच्या जीवनात आपण बऱ्याचदा क्यू आर कोडचा वापर करत असतो. चला तर मग क्यू आर कोड चा वापर आणि उपयोग याबद्दल माहिती जाणून घेऊया. 

  1. आपल्या वेबसाईट, ई-मेल आणि व्यवसाय याबद्दलची आवश्यक माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या QR चा वापर केला जातो.  
  2. QR Code चा सर्वात जास्त वापर हा ऑनलाईन पेयमेन्ट करण्यासाठी होत असतो. जसे कि तुम्ही शॉपिंग केली आणि त्याचे पेयमेन्ट करण्यासाठी QR कोड स्कॅन करता. कारण QR स्कॅन केल्यानंतर पेयमेन्ट लगेच होते त्यासाठी तुम्हाला त्या दुकानदाराचा मोबाईल नंबर किंवा UPI ID घ्यायची गरज पडत नाही. 
  3. त्याचप्रमाणे एखाद्या प्रॉडक्ट ची आपल्याला माहिती हवी असेल तर त्या प्रॉडक्ट च्या पॅकिंग वरती एक QR कोड दिलेला असतो त्याला स्कॅन करून त्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकतो. 
  4. एखाद्या व्यक्ती ला ऍड्रेस पाठविण्यासाठी, मॅसेज पाठविण्यासाठी किंवा काही महत्त्वाच्या दस्तऐवजांना सुरक्षितरीत्या पाठविण्यासाठी देखील क्यू आर कोड खूप फायदेशीर ठरतो.

अश्याच इतरही खूप प्रकारे या QR Code चा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

QR Code चा Full Form काय आहे?

QR कोड चा फुल्ल फॉर्म क्विक रिस्पॉन्स कोड (Quick Response Code) असा होतो.

QR कोड कशासाठी वापरला जातो?

QR कोड (क्विक रिस्पॉन्स कोड) हा बार कोडचा एक प्रकार आहे जो स्मार्टफोन वरील डिजिटल कॅमेर्‍याद्वारे ऑनलाइन सर्वसामान्य माहिती, सूचना मिळविण्यासाठी किंवा ऑनलाईन पैशांचे पेयमेन्ट करण्यासाठी वापरला जातो.


निष्कर्ष | QR Code Information in Marathi

आम्हाला आशा आहे कि वरील लेखामध्ये QR Code म्हणजे काय? हि संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच समजलीच असेल, तरी तुम्हाला सदर लेखाबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. 

तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नोंदवा. 

धन्यवाद!!

Leave a Reply