फॉटोशॉप म्हणजे काय? | Photoshop in Marathi

फॉटोशॉप म्हणजे काय

जर ग्राफिक डिजायनिंग या क्षेत्रात तुम्हाला रुचि असेल तर तुम्हाला फॉटोशॉप म्हणजे काय किंवा त्याचा वापर कशासाठी केला जातो या बद्दल नक्कीच माहीती असेल. 

ॲनिमेशन, ग्राफिक डिजायनिंग, फोटो एडिटिंग अश्या क्षेत्रामध्ये करियर करायचे असेल तर तुम्हाला फोटोशॉप म्हणजे काय? या एडिटिंग सॉफ्टवेअर बद्दल संपूर्ण माहिती असणे फार महत्वाचे आहे. म्हणून च आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी फॉटोशॉप या बद्दल संपूर्ण माहिती व याच वापर कुठे, का व कशासाठी केला जातो ह्या बद्दल माहीती करून घेऊया.  

फॉटोशॉप म्हणजे काय? | Photoshop Information in Marathi

फॉटोशॉप हे अँडोब द्वारे विकसित एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, अँडोब या प्लॅटफॉर्म द्वारे इमेज एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, डिजिटल आर्टस् बनविण्यासाठी तयार करण्यात आलेला एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे. त्याचप्रमाणे यामध्ये प्रतिमेला रंग, अवतार व मुखवटे आणि फिल्टर्स उपलब्ध आहेत. तसेच या मध्ये अनेक नवनवीन फीचर्स प्रदान केले जातात याच्या माध्यमातून आणखी आकर्षक एडिटिंग, डिझाईनिंग करू शकतो.   

या सॉफ्टवेअर ला फोटोग्राफर, ग्राफिक डिझायनर आणि वेब डिझायनर्स यांच्या द्वारे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच या फोटोशॉप मध्ये प्रतिमा निर्मिती, फोटो एडिटिंग आणि ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअर अश्या विविध प्रकारच्या क्रिया केल्या जातात. Adobe फोटोशॉप हे 1988 मध्ये थॉमस आणि जोन्स यांच्याद्वारे Macintosh कम्प्युटर या प्लॅटफॉर्म साठी बनवण्यात आले होते. मात्र नंतर या सॉफ्टवेअरचा वापर हा Windows आणि macOS या प्लॅटफॉर्म द्वारे करण्यात आला. 

अँडोब फोटोशॉप हे त्या क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तीसाठी एक सर्वात महत्त्वाचे टूल आहे. बिगिनर साठी फॉटोशॉप बद्दल काही महत्त्वाचे ट्यूटोरियल देखील दिले जातात जे पाहताना फोटोशॉप चा वापर कसा करावा याबद्दल माहिती देते.


फॉटोशॉप ची वैशिष्ट्य | Features of Photoshop in Marathi

फोटोशॉप ची काही महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे फॉन्ट, प्रभाव, स्पॉट इफेक्ट, ब्रश तसेच पेन टूल्स यामधील काही महत्वाचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत. 

  1. Brush हे फोटोशॉप मधील सर्वात महत्त्वाचे लोकप्रिय साधन आहे. ब्रशचा वापर हा विविध इफेक्ट साठी केला जातो जसे की पेंटिंग, इमेजेस रीकन्स्ट्रक्शन, मिटवणे तसेच कलर कॉम्बिनेशन हे सर्व समाविष्ट आहे.
  2. Clone Stamp म्हणजेच प्रतिमेच्या एका भागामधून तुम्ही पिक्सेल किंवा एखादा भाग कॉपी करून दुसऱ्या भागामध्ये पेस्ट करू शकता. प्रतिमेचा एखादा खराब झालेला भाग किंवा खराब झालेले प्रतिमा हे दुरुस्त करण्यासाठी क्लोन स्टॅम्प चा वापर सर्वात जास्त केला जातो.
  3. Healing Brush क्लोन स्टॅम्प यासारखेच आहे मात्र तुमच्या प्रतिमेला नैसर्गिक स्वरूप देण्यासाठी हिलिंग ब्रश चा वापर केला जातो. म्हणजेच एखाद्या पिक्सेलला व त्याच्या आसपास कॉपी केलेल्या भागाला त्या चित्रामध्ये नीट नैसर्गिक स्वरूप दिले जाते.
  4. History Brush चा वापर हा तुमच्या चित्राला पूर्वीसारखे बनवण्यासाठी केला जातो तसेच हिस्टरी ब्रशचा वापर हा तुमच्या चुका पूर्ववत करण्यासाठी देखील केला जातो.
  5. Blur Background हे फिचर आपल्या सर्वांनाच माहीत असते, ब्लर फीचर चा वापर हा चित्रामधील पिक्सेल हे अस्पष्ट करण्यासाठी केला जातो ज्यामुळे पिक्सेलचा तो भाग कमी वेगळा होतो. ब्लर या फीचर चा वापर हा चित्र नाजूक दिसण्यासाठी किंवा सुरकुत्या तसेच इतर अपूर्णता कमी करण्यासाठी ब्लर या फिचरचा वापर केला जातो.
  6. Sharpe हे फीचर ब्लर या फिचरपेक्षा अगदी वेगळे आहे. तुमचा पिक्सेल हा अधिक उठून दिसण्यासाठी किंवा ते अधिक नाट्यमय दिसण्यासाठी शार्प या टूलचा वापर केला जातो.
  7. The Dodge tool and the Burn या फिचरचा वापर सर्वात जास्त इमेज रिकन्स्ट्रक्शन करताना केला जातो. तुमच्या पिक्सेलचा भाग हा हलका किंवा अधिक गडद करण्यासाठी या टूलचा वापर केला जातो.
  8. Sponge Tool चा वापर हा इमेज मधून रंग शोषून घेने किंवा त्या इमेज मध्ये अधिक रंग सोडू शकतो.

अश्या प्रकारे वरील सर्व फीचर्स फोटोशॉप या सॉफ्टवेअर मध्ये दिसून येतात.

आणखी माहिती वाचा – मायक्रोसॉफ्ट वर्ड बद्दल संपूर्ण माहिती


फोटोशोप चा वापर | Uses of Photoshop

  • वर्तमानपत्रे, मॅक्जीन, पोस्टर यांसारख्या प्रिंट प्रोजेक्टसाठी ग्राफिक, लेआउट तयार करण्यासाठी फोटोशॉप चा वापर केला जातो. सॉफ्टवेअर साठी वेबसाईट डिझाईनिंग, लोगो डिझाईनिंग आणि इतर डिजिटल आर्ट्स देखील आपण तयार करू शकतो. फोटो शॉप मध्ये बनविलेल्या प्रतिमा अर्थात फोटोज आपण संगणकावर विविध फाईल प्रकारांनी सेव करू शकतो. 
  • फोटोशॉपचा वापर मुख्यत्वे करून फोटोग्राफर व्यक्तींकडून केला जातो. मात्र आजकालच्या ऑनलाइन युगात फोटोग्राफर व्यक्तींसोबतच फोटोशॉप चा वापर ग्राफिक डिझाइनर, वेब डिझायनर ,एस्कॉर्ट इमोजी क्रियेटर, मीम्स बनविणारी यांसारख्या प्रतीतयश व्यावसायिक व्यक्तींकडून उच्च दर्जाच्या प्रतिमा बनविणे तसेच त्यामध्ये आवश्यक तो बदल करून त्या प्रदर्शित करणे यांसाठी देखील केला जातो.
  • या सॉफ्टवेअरचा वापर घरगुती तत्त्वावर देखील केला जाऊ शकतो मात्र यासाठी काही पेड सबस्क्रीप्शन्स असतात .आपल्याला जर नेहमी वापर असेल तर आपण घरगुती तत्त्वावर देखील या सबस्क्रिप्शनला घेऊन फोटोशॉप वापरू शकतो.
  • आपल्याला केवळ शिकण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर करावयाचा असेल तर आपण अगदी मोफत रित्या आपण सॉफ्टवेअर वापरू शकतो. ज्यामध्ये गिंप या सॉफ्टवेअरचा देखील समावेश होतो जो मायक्रोसॉफ्ट, विंडोज, मॅक ओएस लिनक्स इत्यादी प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमस्वर सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतो.

आणखी माहिती वाचा – Excel बद्दल सविस्तर माहिती


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

फोटोशॉप नक्की काय आहे?

फॉटोशॉप ला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तसेच एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम देखील म्हणू शकतो. या सॉफ्टवेअर ला अँडोब या प्लॅटफॉर्म द्वारे इमेज एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, डिजिटल आर्टस् बनविण्यासाठी तयार केले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये प्रतिमेला रंग, अवतार व मुखवटे आणि विविध फिल्टर्स उपलब्ध आहेत. तसेच या मध्ये अनेक नवनवीन फीचर्स प्रदान केले जातात याच्या माध्यमातून आणखी आकर्षक एडिटिंग, डिझाईनिंग करू शकतो.

फोटोशॉप मध्ये काय कार्य करू शकतो? 

 For Photo Editing
2. To Create Photo Manipulations
3. For Graphic Design Work
4. To Design A Logo
5. To Remove Backgrounds From A Photo
6. For Improving Product Photos
7. To Create Digital Art
8. To Create GIF Animations
9. To Remove Distractions From Images
10. To Enhance Images For Print
11. To Create Website Mockups
12. For General Creative Use
इत्यादी प्रकारची कार्य आपण फोटोशॉप या अप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये करू शकतो.


निष्कर्ष | Photoshop Meaning in Marathi

वरील लेखामध्ये फोटोशॉप या विषयावरील माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल कंमेंट करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी काही सॉफ्टवेअर, टूल्स, अँप्लिकेशन अश्या कोणत्याही विषयाबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला कालवा. आम्ही नक्कीच तुम्हाला महत्वाची आणि उत्कृष्ट माहिती देण्याचा प्रयत्न करू. 

तसेच या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना मित्र मैत्रिणींना हा लेख वाचण्यासाठी फॉरवर्ड अथवा शेअर करा. 

धन्यवाद!

Leave a Reply