Income Tax Return म्हणजे काय? | ITR Meaning in Marathi

ITR म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो, भारतातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या उत्पन्नावर आयकर नियमांनुसार भारत सरकारला कर भरावा लागतो. जर तुम्ही व्यक्ती, असोसिएशन किंवा फर्म, एलएलपी, कंपनी, संस्था, संघटना, स्थानिक प्राधिकरण किंवा हिंदू अविभक्त कुटुंबातील सदस्य असाल आणि तुमचे उत्पन्न सरकार द्वारे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर  प्रत्येक आर्थिक वर्षासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर आयकर कायद्यानुसार कर भरावा लागतो. 

तर चला या पोस्ट मध्ये आयटी रिटर्न म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण आणि विस्तृत माहिती जाणून घेऊया. 

वार्षिक आधारावर आपले प्राप्तिकर विवरण अर्थात आयटीआर (Income Tax in Marathi) भरणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आयकर रिटर्न ऑनलाइन अथवा ऑफलाइन भरणे यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.


आयकर म्हणजे काय? | Income Tax in Marathi

Income Tax हा एक इंग्रजी शब्द आहे याचा मराठी अर्थ आय कर असा होतो. आयकर ची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. 

आर्थिक वर्षांमध्ये करदात्याच्या एकूण उत्पन्नावर जो कर आकारण्यात येतो त्याला आयकर असे म्हणतात. आयकर हा आपल्या देशाच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. जो केंद्र सरकारद्वारे गोळा करण्यात येतो. 


Income Tax Return म्हणजे काय? | ITR म्हणजे काय?

ITR म्हणजेच आयकर रिटर्न हा एक प्रकारचा दस्तऐवज किंवा फॉर्म्स चा एक संच आहे. ज्यामध्ये आर्थिक वर्षातील एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यावसायिक संस्थाच्या उत्पन्नाची व देय करांची माहिती दाखल केलेली जाते, ITR मध्ये दाखल केलेली माहिती 1 एप्रिल पासून पुढील वर्षाच्या 31 मार्च दरम्यान झालेल्या व्यवहारांसंबंधित असते आणि हि सर्व माहिती त्या विशिष्ट आर्थिक वर्षाकरिता लागू असते.

आयकर रिटर्नमध्ये सामान्यत: उत्पन्नाचे स्रोत, वजावट आणि क्रेडिट, कर भरणे आणि कोणताही कर परतावा किंवा देय शिल्लक यासारख्या तपशीलांचा समावेश असतो.

जसे की एखादी कंपनी त्यांची उत्पन्न, खर्च आणि इतर संबंधित आर्थिक अहवाल तयार करण्यासाठी आणि त्यांच्या आयकर दायित्वांची म्हणजेच इनकम टॅक्स ची गणना आणि भरणा करण्याच्या उद्देशाने सर्व माहिती गोळा करते आणि नंतर या ITR फॉर्म्स च्या स्वरूपात हि सर्व माहिती गव्हर्नमेंट च्या इनकम टॅक्स पोर्टल वरती अपलोड केली जाते. 

या मध्ये जर कंपनी ला टॅक्स भरायला येत असेल तर त्या टॅक्स चे पेयमेन्ट केले जाते, आणि तसेच जर तुम्ही वर्षभरामध्ये जास्त कर भरला असेल तर तुम्हाला आयकर विभागाकडून त्याचा परतावा देखील मिळेल.

आणखी माहिती वाचा – वस्तू आणि सेवा कर (GST) म्हणजे काय?


ITR चा फुल्ल फॉर्म | ITR Full Form in Marathi

आयटीआर चे संक्षिप्त रूप “Income Tax Return” असे आहे, याला मराठी मध्ये “आयकर विवरण पत्र” किंवा “आयकर रिटर्न” म्हणतात.


 ITR का दाखल करावा? | Why should you file ITR

ज्या व्यक्तीचे एका वर्षांमधील उत्पन्न २ लाख ५० हजार पेक्षा अधिक असते त्या व्यक्तीला ITR रिटर्न भरणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. तसेच आयकर नियमानुसार ज्यांचे उत्पन्न करपात्र असेल तर अशा सर्व नोंदणीकृत करदात्यांना प्रत्येक वर्षाच्या टॅक्स स्लॅबनुसार कर विवरणपत्र म्हणजेच आयटीआर ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे.

तसेच जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न खूप अधिक आहे आणि त्यांनी आयकर विवरणपत्र भरले नाही तर त्यांना Income Tax Department कडून नोटीस येईल आणि त्यामध्ये जर त्यांनी योग्य इनकम दाखवून योग्य तो टॅक्स भरला नाही तर त्यांना त्या टॅक्स च्या रकमेवर दंड, इंटरेस्ट आणि त्याचबरोबर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. 

त्याचप्रमाणे या आर्थिक वर्षाकरिता म्हणजेच Financial Year – 2022-23 करीता कर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 असणार आहे. आणि नियोजित तारखेनंतर तुमचा आयटीआर दाखल केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. 

आणखी माहिती वाचा – Excel बद्दल संपूर्ण माहिती


इनकम टॅक्स रिटर्न भरणे कोणाला बंधनकारक आहे? | Who is liable to file Income Tax Return

  • कोणतीही व्यक्ती ज्याचे वय 59 वर्षांपेक्षा कमी आहे, आणि तिचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे. 
  • कोणतीही व्यक्ती ज्याचे वय 60 ते 70 या वयोगटामध्ये आहे, आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न रु. 3.00 लाखांपेक्षा जास्त आहे. 
  • कोणतीही व्यक्ती ज्याचे वय 80 पेक्षा जास्त आहे, आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न रु. 5.00 लाखांपेक्षा जास्त आहे.
  • (उत्पन्नाचे मोजमाप करताना आयकर कायद्याच्या कलम 10 अंतर्गत नमूद केलेल्या कपातींना परवानगी न देता उत्पन्नाची गणना केली पाहिजे.)
  • वार्षिक उत्पन्न कमवत असलेली नोंदणीकृत कंपनी, जर तिने या आर्थिक वर्षाच्या कालावधीत नफा कमावला असला तर. (मात्र नफा कमावलेला असो किंवा नसो ITR विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असते.)
  • एखादी व्यक्ती अतिरिक्त आयकर किंवा वार्षिक उत्पन्नातून वजा केलेल्या करावर परतावा मागू इच्छिते.
  • देशाबाहेर मालमत्ता असलेली किंवा इतर कोणतेही आर्थिक हितसंबंध असलेली व्यक्ती. (परकीय कमाई)
  • देशामध्ये केलेल्या व्यवहारांवर किंवा करारावर लाभ असलेली भारताबाहेरची कंपनी. (परकीयांचे भारतीय उत्पन्न)
  • NRI ज्यांची कमाई 2.5 लाख रुपयांच्या मूळ वार्षिक सूट मर्यादेपेक्षा जास्त आहे. (भारताचे परकीय नागरिक)

त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब, फर्म, एलएलपी, कंपनी, संस्था, संघटना आणि वर उल्लेख केलेली कोणतीही व्यक्ती आयकर कायदा 1961 नुसार आयकर भरण्यास जबाबदार आहेत.


ITR File करण्याकरिता प्रक्रिया | ITR Process in Marathi

जेव्हा तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात ITR भरण्याची प्रक्रिया सुरू करता त्यावेळी सर्वात आधी आपण आर्थिक वर्षात जे काही उत्पन्न मिळविले आहे, ते कोणत्या प्रकारचे इनकम आहे हे लक्षात घेतले जाते. त्यामध्ये उत्पन्नाचे पुढील पाच प्रकार पडतात. 

Heads of Income Tax । उत्पन्नाचे प्रकार 

पगारातुन मिळविलेले उत्पन्न । Income from Salary
घराच्या मालमत्तेतून उत्पन्न । Income from House Property
व्यवसायाद्वारे मिळविलेले उत्पन्न । Income from Profits and Gain of Business or Profession
भांडवली नफ्यातून उत्पन्न । Income from Capital Gains
इतर स्त्रोतांकडून उत्पन्न । Income from Other Sources

या नंतर तुमचे उत्पन्न कुठल्या प्रकारामध्ये येते त्यानुसार तुम्हाला सर्व कागदपत्र गोळा करावे लागतात. त्यामध्ये तुमच्या पगाराच्या स्लिप्स, बँक बचत खात्याचे पासबुक, आधार कार्ड, तसेच पॅन कार्ड तसेच याव्यतिरिक्त देखील काही फॉर्म्स आणि कागदपत्रे गोळा करावी लागतील. 

आणि नंतर हि सर्व कागदपत्रे तुमच्या CA कडे म्हणजेच CHARTERED ACCOUNTANT कडे द्यावी. आता तुमची ITR भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. त्याचप्रमाणे ITR भरताना आवश्यक असलेल्या काही फॉर्म्स बद्दल माहीती जाणून घेऊया.

आयकर रिटर्न्स चे फॉर्म्स भरत असताना आवश्यक असलेल्या काही फॉर्म्स बद्दल माहीती जाणून घेऊया. 

  • Form 16 

या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेला पगार आणि त्यावरील कर वजावटीचा (टीडीएस) इत्यादींचा तपशील असतो.

  • Form 16A 

यामध्ये मुदत किंवा मागणी बँक ठेवी यांसारख्या ठेवींमधून मिळालेल्या व्याजावर टीडीएस कापल्याचा तपशील असतो.

  • Form 16B 

तुम्ही जर मालमत्ता विकली तर, खरेदीदाराकडून तुम्हाला मिळालेल्या रकमेवर TDS लागू होतो, ज्याचा तपशील या फॉर्ममध्ये असतो.

  • Form 16C 

या फॉर्म मध्ये तुमच्या भाडेकरूने तुम्हाला दिलेल्या भाड्याचे TDS तपशील येथे नोंदवलेले असतात.

  • Form 26AS

हा फॉर्म पॅन क्रमांकाविरुद्ध तुमची सर्वसमावेशक कर विवरण दर्शवतो. यामध्ये तुमच्या बँक किंवा तुम्हाला पेमेंट केलेल्या इतर कोणत्याही संस्थेचा TDS समाविष्ट असतो. भरलेला आगाऊ कर किंवा स्व-मूल्यांकन कर, कर बचत गुंतवणुकीचा पुरावा जसे की कलम 80C ते 80U मधील वजावट यासह जीवन विमा पॉलिसी किंवा मुदत योजना या देखील यामध्ये नमूद असतात.

या व्यतिरिक्त सुद्धा आयटीआर रिटर्न फाईल करण्यासाठी अनेक दस्तऐवजांची गरज असते ते पुढील प्रमाणे आहेत. 


आयटीआर ऑनलाइन कसे फाइल करावे | How to file ITR Online FY 2022-23 (AY 2023-24)

  1. उत्पन्नाची आणि कराची गणना करणे | Calculation of Income and Tax 

आयकर रिटर्न भरताना सर्वात आधी करदात्याने उत्पन्नाची गणना करणे खूप गरजेचे आहे, त्यानंतर करदात्याला मिळालेले उत्पन्न कोणत्या प्रकारचे आहे हे लक्षात घ्यावे.

  1. TDS & TCS प्रमाणपत्र आणि फॉर्म 26AS तपासणे । TCS & TDS Certificate and Form 26AS

या मध्ये करदात्याच्या पॅन क्रमांकाविरुद्ध तुमची सर्वसमावेशक कर विवरण दर्शवतो. तुमच्या बँक किंवा तुम्हाला पेमेंट केलेल्या इतर कोणत्याही संस्थेचा TDS किंवा TCS समाविष्ट असतो. टीडीएस किंवा टीसीएस हा आगाऊ भरलेला कर असतो. 

त्यामुळे रिटर्न भरण्याच्या अगोदर हे सर्व प्रमाणपत्र पाहणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे करदात्याने आर्थिक वर्षांमध्ये केलेल्या टॅक्स सेविंग इन्व्हेस्टमेंट किंवा LIC तसेच इतरही काही असलेल्या कपाती लक्षात घ्याव्या. 

  1. आयकर फॉर्म निवडा । Choose the right Income Tax Form

आयटीआर फॉर्म चे विविध प्रकार आहेत त्यामधील कुठला फॉर्म करदात्याने भरायला हवा याबद्दल थोडा अभ्यास करायला हवा आणि नंतर योग्य तो फॉर्म सिलेक्ट करून घ्यावा. ITR FORM पुढील प्रकारचे आहेत. 

Types of ITR Forms | ITR फॉर्म्स चे प्रकार

तसेच आयटीआर फॉर्म तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही प्रकारे भरू शकता तसेच ITR 1 आणि ITR 4 हे दोन फॉर्म ऑनलाईन फाईल करता येतात बाकी ITR-5, ITR-6, ITR-7 हे फॉर्म ऑफलाईन सबमिट करावे लागतात. 

  1. आयटीआर युटिलिटी डाउनलोड करा | Download ITR Utility from IT Portal

आता योग्य तो आयकर फॉर्म ची निवड केल्यानंतर Income Tax Portal वरून इनकम टॅक्स फॉर्म ची योग्य ती युटिलिटी डाउनलोड करून घ्या. 

  1. नंतर या ऑफलाइन युटिलिटी मध्ये तुमच्या उत्पन्नाचे सर्व तपशील योग्य प्रकारे भरा आणि या तपशील नुसार टॅक्स ची गणना केली जाईल ती योग्य असेल तर या प्रविष्ट केलेल्या माहितीला सत्यापित करा म्हणजेच Validate करा. 
  2. आता तुमची ITR युटिलिटी मधील सर्व माहिती सत्यापित झाली आहे आणि यानंतर या युटिलिटी ला XML फाईल फॉरमॅट मध्ये रूपांतरित करून घ्यावे. 
  1. ITR युटिलिटी मध्ये करदात्यांचा सर्व डेटा उपलब्ध आहे आता हि XML फॉरमॅट मध्ये युटिलिटी फाईल आपल्याला इनकम टॅक्स पोर्टल या साईट वर लॉग इन करून अपलोड करावी लागेल. त्यासाठी करदात्यांचा User ID आणि Password घेऊन IT पोर्टल वर साइन इन करा. 
  1. त्यानंतर आयटीआर रिटर्न हा पर्याय निवडून हि XML फाईल सबमिट करा. फाईल सबमिट केल्यानंतर पडताळणी साठी एक आधार ओटीपी येईल त्याला प्रविष्ट करून तुमचे रिटर्न व्हेरिफाय करा. 

अश्या प्रकारे वरील सर्व प्रक्रियेनुसार इनकम टॅक्स रिटर्न भरले जातात. 


ITR File करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे | Documents Required for Filing ITR

document required for business itr

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

What Is Income Tax Slab ?

ITR स्लॅब म्हणजे करदात्याला आर्थिक वर्षांमध्ये कमविलेल्या उत्पन्नावर किती दराने कर आकारल्या जाईल यांची सर्व माहिती दिलेली असते. 

Last Date to File ITR FY 2022-23 in india

ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. तसेच ज्या कंपन्यांना ऑडिट म्हणजेच लेखापरीक्षण ची आवश्यकता असेल त्यांच्या साठी FY 2022-23 या आर्थिक वर्षाची इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ हि आहे. 


निष्कर्ष | Income Tax Information in Marathi

अश्या प्रकारे इनकम टॅक्स रिटर्न आणि टॅक्स ची गणना केली जात असते, वरील लेखामधून तुम्हाला आयटी रिटर्न म्हणजे काय? इनकम टॅक्स रिटर्न चे प्रकार आणि ITR कश्या पद्धतीने फाईल केला जातो या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील तरी तुम्हाला आणखी काहीही IT Return बद्दल ची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला ई-मेल करा किंवा कंमेंट करा. 

तसेच तुम्हाला वरील लेख कसा वाटलं याबद्दल देखील तुमचा अभिप्राय कळवा, आणि त्याचबरोबर जर काही सूचना असतील तर नक्की सांगा आम्ही तुमच्या सूचनेनुसार लेखाला अपडेट करू. तसेच आपल्या इतरही ITR Return फाईल करत असलेल्या मित्र-मैत्रिणींना आणि वडीलधाऱ्या करदात्यांना देखील ही माहिती शेअर करा. 

धन्यवाद!!

Leave a Reply