IPS Full Form in Marathi | IPS म्हणजे काय?

IPS चा फुल्ल फॉर्म

IPS म्हणजे काय? । IPS Meaning in Marathi 

आयपीएस हे एक उच्च प्रतिष्ठा प्राप्त असलेले सरकारी पद आहे. आयपीएस अधिकारी हा आपल्या प्रदेशात शांतता अणि सुव्यवस्था स्थापित करत असतो, सर्व गुन्ह्यांची चौकशी करत असतो. त्यावर देखरेख ठेवत असतो.

आज आयपीएस अधिकारी बनण्यासाठी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, अणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न बघत आहेत. 

IPS चा फुल्ल फॉर्म | IPS full form in Marathi

आयपीएस चा फुल्ल फॉर्म “Indian Police Service” असा होतो, यालाच मराठी मध्ये “भारतीय पोलीस सेवा” असे देखील म्हटले जाते.

IPS Full Form Indian Police Service | भारतीय पोलीस सेवा

आयपीएस अधिकारी बनण्यासाठी Upsc म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) याद्वारे परीक्षेचे आयोजन केले जात असते.


IPS परीक्षा पात्रता | IPS Exam Eligibility

  • संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ह्या परीक्षेसाठी उमेदवाराने शासनमान्य विद्यापीठातुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
  • किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी देखील ह्या परीक्षेसाठी बसण्यास पात्र ठरतात. केवळ डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन करताना उमेदवाराकडे पदवीचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने भारताचे नागरीक असणे आवश्यक आहे.
  • सर्व कॅटॅगरी मधील उमेदवारांचे वय किमान २१ असणे आवश्यक आहे. जनरल कॅटॅगरी करीता कमाल वयोमर्यादा ३२ ठेवण्यात आली आहे.
  • एस सी एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा अट ३७ अणि ओबीसी करीता ३५ ठेवण्यात आली आहे.

आयपीएसची परीक्षा आपण किती वेळा देऊ शकतो?

आयपीएसच्या परीक्षेला कोणता उमेदवार किती वेळा बसु शकतो हे कॅटॅगरी नुसार निर्धारित करण्यात येत असते. जनरल कॅटॅगरी मधील उमेदवार ह्या परीक्षेला सहा वेळा बसु शकतात. 

ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवार ह्या परीक्षेसाठी ९ वेळा बसु शकतात, एस सी एसटी कॅटॅगरी मधील उमेदवारांसाठी अशी कुठलीही विशेष अट ठेवण्यात आली नाहीये ते ३७ वयोवर्ष होईपर्यंत पाहीजे तितक्या वेळा ह्या परीक्षेला बसु शकतात.


IPS बनण्यासाठी काय करावे लागते?

आयपीएस अधिकारी बनण्यासाठी आपणास सर्वप्रथम आयपीएसची परीक्षा द्यावी लागते त्यासाठी आपणास Upsc च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम अर्ज करणे आवश्यक आहे.

फॉर्म भरताना काही आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, सही इत्यादी कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतात. आयपीएस परीक्षेत उमेदवाराची निवड ही पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा एकूण तीन टप्प्यांत केली जात असते.

मुख्य परीक्षेसाठी बसण्यास उमेदवाराला पुर्व परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. पुर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर शेवटी उमेदवाराची मुलाखत घेतली जाते.

अणि शेवटी मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार योग्य त्या पदावर नियुक्ती केली जाते. त्याआधी त्या उमेदवाराला प्रशिक्षण दिले जाते आणि या प्रशिक्षणामध्ये सामान्यतः चार टप्प्यांचा समावेश होतो. 

IPS अधिकाऱ्ऱ्यांचे प्रशिक्षण 

  • फाऊंडेशन कोर्स
  • फेज वन ट्रेनिंग
  • फेज टु ट्रेनिंग
  • जिल्हा स्तरीय प्रशिक्षण

IPS परीक्षेत उमेदवाराचे शारीरिक मुल्यमापन

आयपीएस परीक्षेसाठी पुरूषांची उंची १६५ सेंटीमीटर पाच फुट पाच इंच अणि महिलांसाठी १५० सेंटीमीटर ४ फुट १२ इंच असणे आवश्यक आहे. पुरूष उमेदवारांची छाती ८४ सेंटीमीटर अणि महिला उमेदवारांची ७९ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.

स्वस्थ डोळ्यांकरीता नजर ६/६ ते ६/९ असणे आवश्यक आहे. कमकुवत डोळ्यांकरीता ६/१२ ते ६/९ असणे आवश्यक आहे. डोळयांचा नंबर दुर दृष्टी करीता ४.०० डी पेक्षा अणि नजीकच्या दृष्टीसाठी +४.०० डी पेक्षा जास्त नसावा.


IPS परीक्षेद्वारे कोणकोणत्या पदांवर नियुक्ती होते?

  • सहायक पोलिस अधीक्षक (ASP) । Assistant Superintendent of Police
  • पोलिस महानिरीक्षक (IGP) । Inspector-General of Police 
  • पोलिस उपअधीक्षक (DSP) । Deputy Superintendent of Police 
  • पोलिस महासंचालक (DGP) । Director-General of Police 
  • अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ASP) । Additional Superintendent of Police 
  • पोलिस अधीक्षक (SP) । Superintendent of Police 
  • पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) । Deputy Inspector General of Police 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न । FAQ 

मराठीत IPS चे संक्षिप्त रूप काय आहे?

IPS चे संक्षिप्त रूप “Indian Police Service” असे आहे आणि मराठी मध्ये याला “भारतीय पोलीस सेवा” असे म्हटले जाते. 

IPS अधिकारी चे कार्य काय असते?

आयपीएस अधिकारी यांचे कार्य आपल्या प्रदेशात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हे नियंत्रण, गुन्ह्यांची चौकशी, तसेच तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, आपत्ती व्यवस्थापन, आर्थिक कायद्यांचे संरक्षण आणि इतरही बरेच कार्य आयपीएस अधिकारी करतात.  

IPS परीक्षा कितीदा देता येते?

IPS हि परीक्षा OBC कॅटॅगरी साठी ९ वेळा देता येते, General Category साठी वयाच्या 6 वेळा देता येते आणि SC/ST उमेदवारांना वयाच्या 37 वर्षेपर्यंत आणि कितीही वेळा हि परीक्षा देता येते. 


अश्या प्रकारे वरील दिलेल्या माहिती मध्ये आपण IPS अधिकारी म्हणजेच इंडियन पोलीस सेवा अधिकारी कसे बनू शकतो त्याचा अभ्यासक्रम अश्या प्रकारची बरीच महत्वाची माहिती (बघितली आहे तरी तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर माहिती हवी आहे त्याबद्दल नक्कीच कंमेंट करा. तसेच हि पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. 

धन्यवाद!

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Yashasvi Gharat

    मला अजून माहिती हवी आहे 12th नंतर कसं काय करायचं ते