MPSC चा फुल फॉर्म | MPSC Full Form in Marathi

MPSC चा फुल फॉर्म

MPSC ही महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित केली जाणारी एक सिविल सर्विसेस परीक्षा आहे. राज्याचा कारभार चालवण्यासाठी असलेले अधिकारी जसे की उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या सर्व पदांची भरती ही MPSC परीक्षा मार्फतच केली जाते.

MPSC या परीक्षेसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी तयारी करून ही परीक्षा देत असतात. बरेचसे विद्यार्थी हे राज्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी या परीक्षेकडे वळतात. तर चला या सर्वात महत्वाच्या महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या MPSC चा फुल फॉर्म या बद्दल संपूर्ण आणि सविस्तर मराठी माहिती जाणून घेऊया. 

MPSC फुल फॉर्म मराठी | MPSC Full Form in Marathi 

MPSC चा फुल फॉर्म हा Maharashtra Public Service Commission असा आहे आणि मराठीमध्ये याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे म्हणतात. 

MPSC या संस्थेचे मुख्यालय हे मुंबईमध्ये स्थित आहे. या संस्थेची स्थापना ही राज्याचा कारभार चालवण्यासाठी महत्त्वाच्या पदांची भरती करण्यासाठी करण्यात आली होती. 

एमपीएससी ची परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्यू म्हणजेच मुलाखत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी ही पूर्णपणे राज्य सरकार अंतर्गत चालवली जाते व यामध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नसतो.

आणखी माहिती वाचा – टॉप २६ मराठी बिसिनेस आयडिया याबद्दल संपूर्ण माहिती

MPSC परीक्षा म्हणजे काय? | MPSC Information in Marathi

MPSC म्हणजेच ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ किंवा सोप्या शब्दांमध्ये सांगायला गेलं तर ‘राज्यसेवा’ असेही म्हणले जाते. एमपीएससी ही राज्य सरकारची एक स्वतंत्र संस्था आहे, आणि हीच संस्था विविध सरकारी पदांसाठी भरती प्रक्रिया ही दरवर्षी राबवते. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात येणारी MPSC ही एक परीक्षा आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परिक्षेपैकी एमपीएससी ही एक परीक्षा आहे. 

MPSC या परीक्षेसाठी पात्रता | Eligibility for MPSC Exam

एमपीएससी राज्यसेवा भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेसाठी असलेल्या पात्रता तपासणी हे फार आवश्यक आहे. व अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे आवश्यक असलेली कागदपत्र असणे देखील फार महत्त्वाचे आहे.

  1. एमपीएससी या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी बोलता व लिहिता येणे फार महत्त्वाचे आहे. 
  2. विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे महत्त्वाचे आहे. मग पदवी कोणत्याही शाखेतून असली तरी चालते. विद्यार्थी जर ग्रॅज्युएशन शेवटच्या वर्षात असेल तरीही उमेदवार एमपीएससी पूर्व परीक्षा देऊ शकतो व ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.
  3. एमपीएससी या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 19 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्ष असावे लागते तसेच उमेदवाराच्या कॅटेगरीनुसार वयोमर्यादा मध्ये सवलत देखील असते.
  4. एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असावा लागतो, तसेच बाहेर देशातील नागरिक भारतात राहत असतील तर त्यांना देखील परीक्षा देणे शक्य असते. व या लोकांसाठी पात्रता निकष हा वेगळा असतो.
  5. MPSC या संस्थेमार्फत विविध परीक्षा आयोजित केल्या जातात, जसे की आधी आपण पाहिले एमपीएससी ही एक राज्य सरकार आयोजित संस्था आहे. म्हणूनच एमपीएससी द्वारे राज्यस्तरीय सिविल सर्विसेस सोबतच इतर परीक्षा देखील घेतल्या जातात जसे की, स्टेट सर्विस एक्झामिनेशन, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्विस एक्झामिनेशन, महाराष्ट्र एग्रीकल्चरल सर्विस एक्झामिनेशन, पोलीस इन्स्पेक्टर एक्झामिनेशन, टॅक्स असिस्टंट एक्झामिनेशन, असिस्टंट मोटर वेहिकल इंस्पेक्टर एक्झामिनेशन.

आणखी माहिती वाचा – स्टॉक मार्केट म्हणजे काय? संपूर्ण माहिती

दरवर्षी लाखो मुले एमपीएससी ही परीक्षा देतात व यातून गट A व गट B पदांसाठी उमेदवार निवडले जातात.

  • गट A मधील काही महत्त्वाची पदे म्हणजे उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, उपनिबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी , ब्लॉक विकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर इत्यादी..
  • गट B मधील काही महत्त्वाचे पदे म्हणजेच तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स म्हणजेच तालुका निरीक्षक भूमी अभिलेख आणि नायब तहसीलदार इत्यादी…

या सोबतच अजूनही काही सरकारी सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षा आयोजित करते.

MPSC परीक्षेसाठी निवड प्रक्रिया कशी असते ?

MPSC भरती प्रक्रिया ही प्राथमिक मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये पार पाडली जाते काही पदांसाठी शारीरिक चाचणी देखील घेणे आवश्यक असते. एमपीएससी परीक्षेचा पॅटर्न हा खाली दिला गेला आहे,

  1. MPSC पूर्व परीक्षा

मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याकरिता उमेदवाराला पूर्व परीक्षा पास होणे फार महत्त्वाचे आहे. तसेच तुम्हाला जर पूर्व परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही पदवीधर असणे अत्यंत आवश्यक आहे पदवीच्या शेवटच्या वर्षी देखील तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता. पूर्व परीक्षेचे गुण हे फक्त मुख्य परीक्षे ची पात्रता ठरवण्यासाठीच वापरले जातात व याचा बाकी कोठेही उपयोग केला जात नाही. मुख्य परीक्षेचा पेपर हा एकूण २०० गुणांचा असतो.

  1. MPSC मुख्य परीक्षा

पूर्व परीक्षेमध्ये पास झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतात. मुख्य परीक्षा ही अत्यंत महत्त्वाचे असते ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार पूर्व परीक्षेमध्ये पास असावा लागतो व उमेदवाराकडे पदवीचे प्रमाणपत्र असणे फार महत्त्वाचे असते. मुख्य परीक्षेचे गुण हे उमेदवाराला पदवी देताना ग्राह्य धरण्यात येतात व त्यामुळेच ही परीक्षा खूप महत्त्वाची मानली जाते.

  1. MPSC इंटरव्यू मुलाखत

मुख्य परीक्षा ही पास झाल्यानंतर उमेदवारांची इंटरव्यू साठी निवड केली जाते. आणि शेवटी मुख्य परीक्षा आणि इंटरव्यू याचे मार्क हे ग्राह्य धरले जातात. उमेदवाराला पदवी देताना देखील मुलाखतीचे मार्क्स हे ग्राह्य धरण्यात येतात.

MPSC या आयोगाद्वारे घेतली जाणारी ही मुलाखत एकूण शंभर गुणांची असते व यामध्ये पास होणारा उमेदवार हा एमपीएससी उत्तीर्ण मानला जातो. आणि सरकारी नोकरीसाठी तो पात्र असतो. उमेदवाराला हे तिन्ही टप्पे पार पाडावे लागतात व उमेदवार जर कोणत्याही एका परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याला परत पहिल्यापासून म्हणजेच पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते.


निष्कर्ष | MPSC Meaning in Marathi

अश्या प्रकारे आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC या EXAM बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. तरी तुम्हाला वरील लेखा संबंधित आणखी माहिती हवी असेल तर नक्की कंमेंट करा आणि त्याचप्रमाणे हा लेख शेअर करा.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

MPSC चा फुल्ल फॉर्म काय आहे?

MPSC चा फुल फॉर्म हा “Maharashtra Public Service Commission” असा आहे आणि मराठीमध्ये याला “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” असे म्हणतात.

MPSC परीक्षा म्हणजे काय?

MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग होय. या आयोगाच्या साहाय्याने राज्यात विविध प्रकारच्या परीक्षा आयोजित केल्या जातात त्यामध्ये गट-अ आणि गट-ब अश्या दोन्ही स्तरांवरील अधिकारी पदांसाठी निवड केली जाते. या परीक्षा चाचण्या तीन टप्प्यांत घेतल्या जातात, त्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी म्हणजेच वैयक्तिक मुलाखत होय.

धन्यवाद!!