BBA फुल्ल फॉर्म । BBA Full form in Marathi 

BBA चा फुल्ल फॉर्म आणि BBA म्हणजे काय

मागील काही पोस्ट मध्ये आपण केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि त्याचप्रमाणे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अश्या देशातील सर्वात  महत्वाच्या सिविल सर्व्हिसेस परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण व्यवसाय म्हणजेच बिसिनेस च्या संबंधित असलेल्या BBA या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत, यामध्ये आपण बीबीए म्हणजे काय? आणि हा डिग्री कोर्स करण्यासाठी लागणारी पात्रता काय असते? अश्या प्रकारची सविस्तर माहिती पाहूया. 

BBA फुल्ल फॉर्म । BBA Full form in Marathi 

बीबीए चा फुल फॉर्म Bachelor of Business Administration असा आहे, BBA हा एक बॅचलर डिग्री कोर्स आहे याचा कालावधी तीन वर्षाचा असतो. या तीन वर्षांच्या कोर्स मध्ये सहा सेमिस्टर असतात. 

ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात कुठल्याही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करायची आहे किंवा स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असतो. ते विद्यार्थी आपल्या मधील व्यवसाय कौशल्यामध्ये विकास घडवून आणण्यासाठी तसेच व्यवसाय कौशल्यात ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी लागत असलेल्या संवाद कौशल्य आत्मसात करण्यासाठी बीबीए हा कोर्स करत असतात.


BBA म्हणजे काय? । What is BBA in Marathi 

BBA म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा उद्योग व्यवसाय क्षेत्रातील एक सर्वात महत्वाचा कोर्स आहे. ह्या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय क्षेत्राशी संबंधित सर्व आवश्यक बाबी शिकविल्या जातत.

जसे कि अकाउंटिंग, विपणन व्यवस्थापन, अर्थशास्त्र व्यवस्थापन, व्यवसाय आकडेवारी, व्यावसायिक कायदे, आर्थिक व्यवस्थापन त्याचप्रमाणे व्यावसायिक समस्या सोडवणे आणि सल्लागार कौशल्ये अश्या सर्व प्रकारचे व्यावसायिक कौशल्य या कोर्स मध्ये शिकविली जातात. 

त्याचप्रमाणे बीबीए कोर्स पुर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उद्योजकते विषयी प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या बळावर आपला स्वताचा उद्योग व्यवसाय देखील सुरू करता येतो. 

BBA हि MBA ची बॅचलर डिग्री आहे, BBA नंतर बरेच विद्यार्थी हे MBA कडे वळतात. MBA म्हणजेच Master of Business Administration होय. MBA या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्कील म्हणजेच संवाद कौशल्य अणि बिझनेस स्कील व्यवसाय कौशल्य अश्या गुणांमध्ये अधिक वाढ अणि विकास घडुन येत असतो.


BBA साठी लागणारी प्रवेश पात्रता | BBA Meaning in Marathi

  • कोणत्याही एका शाखेतील बारावी उत्तीर्ण असलेला विद्यार्थी बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.
  • बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • काही मोठमोठ्या महाविद्यालयात बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी एक सर्वसामान्य प्रवेश परीक्षा द्यावी लागते अणि त्यात देखील उत्तीर्ण व्हावे लागते. मग बीबीए साठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. 
  • BBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयोमर्यादा अट १७ ते २२ इतकी ठेवण्यात आली आहे, अणि इतर कॅटॅगरी मधील विद्यार्थ्यांना १७ ते २४ वर्ष इतकी वयोमर्यादा अट ठेवण्यात आली आहे.

अश्या प्रकारे वरील सर्व पात्रता असलेले विद्यार्थी BBA या कोर्स साठी ऍडमिशन घेऊ शकतात. 


बीबीए हा कोर्स कोण करू शकतो?

BBA हा कोर्स कोणताही विद्यार्थी करू शकतो ज्या विद्यार्थ्यांला व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवायची इच्छा आहे, तसेच त्याला व्यवसाय उद्योग क्षेत्राबद्दल रुची असेल तर असे विद्यार्थी बारावीनंतर ह्या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

बीबीए या कोर्स मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपण खालील दिलेल्या काही विषयामध्ये प्राविण्य प्राप्त करून करिअर घडवू शकता किंवा नोकरी प्राप्त करू शकता.

BBA स्पेशलायझेशनमध्ये अकाउंटिंग, वित्त व्यवस्थापन, मार्केटिंग, HR मॅनेजमेंट, खर्च आणि लेखा व्यवस्थापन, इम्पोर्ट एक्स्पोर्ट मॅनेजमेंट, बँकिंग आणि विमा, माहिती तंत्रज्ञान, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी विषयांचा समावेश होतो त्यामुळे चांगल्या पगारासह नोकरीच्या आणि चांगल्या करियर च्या संधी मिळतात.


निष्कर्ष | BBA Information in Marathi

अश्या प्रकारे आज आपण Bachelor of Business Administration म्हणजेच बीबीए कोर्स बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे, आम्हाला आशा आहे कि वरील माहिती तुम्हाला आवडली असेलच.

तसेच तुम्हाला आणखी काही बिसिनेस च्या संबंधित असलेल्या मराठी कोर्सेस बद्दल आणखी माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कळवा. आणि वरील लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दल कंमेंट करा. आणि हा लेख तुमच्या मित्र मित्रांना शेअर करा.


नेहमी विचारले प्रश्न | FAQ

BBA Full form काय आहे?

बीबीए चा फुल फॉर्म बैचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration) असा आहे, तसेच BBA हा एक बॅचलर डिग्री कोर्स आहे. 

MBA Full form काय आहे?

एमबीए चा फुल्ल फॉर्म मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन (Master of Business Administration) असा होतो, तसेच MBA हि मास्टर डिग्री आहे.  

बीबीए हा कोर्स करण्यासाठी किती फी लागते?

बीबीए ह्या कोर्ससाठी जर विद्यार्थ्यांने एखाद्या खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेतला तर त्याला अडीच ते तीन लाखांपर्यंत फी भरावी लागु शकते.पण बीबीए कोर्स साठी जर विद्यार्थ्यांने एखाद्या सरकारी काॅलेज मध्ये प्रवेश घेतला तर खाजगी महाविद्यालयापेक्षा खूप कमी फी लागते.

धन्यवाद!

Leave a Reply