What is Million Billion Trillion in Marathi

You are currently viewing What is Million Billion Trillion in Marathi

तुम्ही कधी व्यावहारिक हिशोब केलाय का? सर्वांची उत्तरे हो असेच असतील. कारण कि प्रत्येक गोष्ट हि हिशोबात मोजूनच त्याची व्याप्ती माहिती पडते. जसं कि आपण भारतामध्ये संख्या दर्शविताना हजार, लाख, करोड आणि अब्ज या शब्दांचा वापर करतो

पण ते आपल्या भारतापुरत मर्यादित आहेत परंतु भारताबाहेर किंवा ह्यांच्यापलीकडे काही गोष्टी मोजायच्या असतील तर तिथे मात्र मिलियन बिलियन आणि ट्रिलियन हे शब्द ऐकायला मिळतात. या हिशोबी शब्दाचा वापर आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो.   

आपण सर्वानी बऱ्याचदा एखाद्या वृत्तपत्रात किंवा बातम्या मध्ये ऐकले असेल कि, सोशल मीडिया मध्ये एखाद्या चॅनल चे मिलियन फोल्लोवर झाले किंवा या व्हिडिओ ला बिलियन, ट्रिलियन व्हिव आले किंवा एखाद्या श्रीमंत व्यक्तीची सम्पत्ती १०० बिलियन पेक्षा जास्त आहे अश्या सर्व गोष्टी मिलियन बिलियन आणि ट्रिलियन मध्ये मोजल्या जातात. 

पण जेव्हा आपण मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन हे शब्द ऐकतो तेव्हा आपण गोंधळून जातो. आता गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही आम्ही तुमच्या साठी मिलियन बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे काय? (What is Million Billion Trillion in Marathi) याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. 


मिलियन म्हणजे काय? | What is Million in Marathi

मिलियन हा शब्द सोशल मीडिया वापरताना जास्त प्रमाणात ऐकण्यात येतो, खास करून युट्युब वर जसं कि युट्युब चॅनल चे १ मिलियन Subscriber किंवा फेसबुक पेज चे १० मिलियन फोल्लोवर्स आहेत. जसे कि, १ मिलियन म्हणजे १० लाख तर १० मिलियन म्हणजे १ करोड. 

मिलियन म्हणजे काय

उदाहरणार्थ, एखाद्या युट्युब चॅनल चे २० मिलियन Subscriber असतील तर मराठी मध्ये २ करोड Subscriber असे समजावे.

१ मिलियन = १० लाख 

५ मिलियन = ५० लाख 

१० मिलियन = १ करोड 

१०० मिलियन = १० करोड    


बिलियन म्हणजे काय? | What is Billion in Marathi

बिलियन चा मराठी अर्थ अरब असा होतो. बऱ्याच वेळी सोशल मीडिया किंवा युट्युब च्या व्हिडिओ ला बिलियन Like आणि Views येत असतात. १ बिलियन म्हणजेच १ अरब किंवा १०० करोड.  

बिलियन म्हणजे काय

१ बिलियन = १ अरब (१०० करोड )

५ बिलियन = ५ अरब (५०० करोड )

१० बिलियन = १० अरब (१००० करोड )

५० बिलियन = ५० अरब (५००० करोड )

१०० बिलियन = १०० अरब (१०००० करोड )   

>> हे पण वाचा – संगणक म्हणजे काय? संपूर्ण माहिती


ट्रिलियन म्हणजे काय? | What is Trillion in Marathi

ट्रिलियन हि एक खूप मोठी संख्या आहे. मिलियन आणि बिलियन बऱ्याच लोकांना माहिती असेल पण ट्रिलियन बद्दल खूप कमी लोकांना च माहिती असेल. याचा उपयोग खूप मोठी गणना करायला होतो. बहुतेकदा ट्रिलियन या संख्येचा चा उपयोग एखाद्या देशाचा जीडीपी मोजायला करतात. 

मिलियन बिलियन ट्रिलियन याबद्दल संपूर्ण माहिती

१ ट्रिलियन = १000 बिलियन 

२ ट्रिलियन = २000 बिलियन 

३ ट्रिलियन = २५00 बिलियन 

५ ट्रिलियन = ५000 बिलियन 


निष्कर्ष 

अश्या प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहार बघायला गेलो तेव्हा मिलियन, बिलियन आणि ट्रिलियन या गोष्टीशी संबंध येतो. म्हणूनच आपल्याला मिलियन बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे काय? (What is Million Billion Trillion Meaning in Marathi) याबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते. 

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला या लेखामधून मिलियन बिलियन आणि ट्रिलियन म्हणजे किती संख्या होते हे नक्कीच कळले असेल, तरी तुम्हाला काही शंका असतील तर नक्की आमच्या सोबत शेअर करा. आणि या ब्लॉग पोस्ट ला शेअर करायला विसरू नका. 

 🙏धन्यवाद !🙏 

Leave a Reply