कीबोर्ड म्हणजे काय? | Keyboard Meaning in Marathi

कीबोर्ड म्हणजे काय

किबोर्ड या बद्दल तुम्हा सर्वाना नक्कीच माहिती असेल, कि हा संगणकाचा एक महत्वाचा घटक आहे. बऱ्याच लोकांनी संगणकावरती काम केले असेल त्यांना Keyboard बद्दल संपूर्ण माहिती असेलच पण ज्या काही लोकांनी संगणक हाताळलेले नसेल त्यांना सुद्धा कीबोर्ड बद्दल माहिती घ्यायला हवी. 

म्हणूनच आज आम्ही या पोस्ट मध्ये कीबोर्ड म्हणजे काय? आणि याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. 

चला तर मग जाणुन घेऊयात किबोर्ड विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहीती | Keyboard Information in Marathi

कीबोर्ड म्हणजे काय ? | What is Keyboard in Marathi

कीबोर्ड हे एक संगणकाचे सर्वात महत्वाचे इनपुट साधन आहे. Keyboard या साधनांचा संगणका वर सर्वात जास्त वापर केला जातो. जे की वापरकर्त्यांना संगणक किंवा बाकीच्या इलेक्ट्रॉनिक मशिनरी मध्ये टेक्स्ट (आपल्या विचारांची इलेक्ट्रिक देवाणघेवाण) टाईप करण्यासाठी मदत करते.

कीबोर्ड मधील निम्या पेक्षा जास्त कीज अक्षर आणि संख्या ने दर्शविलेल्या असतात. बाकीच्या उरलेल्या कीज प्रतिक्रिया दर्शवतात. काही क्रियांना पूर्ण करणयासाठी एकापेक्षा जास्त कीज चा वापर केला जातो. याला संगणकाला जोडण्यासाठी केबल वायर चा वापर केला जातो किंवा वायरलेस हि असू शकते. 

>> हे पण वाचा – संगणक बद्दल संपूर्ण माहिती


कीबोर्ड चे प्रकार | Type of Keyboard in Marathi

जगभरात विविध प्रकारचे कीबोर्ड वापरले जातात. त्यातील काही मुख्य कीबोर्ड आपण आज या लेखात पाहणार आहोत.

Qwerty Keyboard 

सर्वात जास्त वापरला जाणारा कीबोर्ड चा प्रकार ‛Qwerty’ हा आहे. जेव्हा अगोदर संगणक आले तेव्हा संगणकवरती कीबोर्ड ला Qwerty keyboard नुसार तयार केले. Qwerty layout ला 1873 रोजी डिजाईन केले. ह्या डिजाईन बनवण्याच्या मागे हा उद्देश होता की, टाईप करताना वापरर्कत्याचा वेळ वाचला पाहिजे आणि त्याच्यकडून टाईप करताना कमी चुका व्हाव्यात. जगात सर्वात जास्त लोक Qwerty keyboard चा वापर करतात. खरंतर हा कीबोर्ड सगळ्यात जलद काम करणारा कीबोर्ड नाहीये.

Dvorak Keyboard

साल 1936 मध्ये Dvorak Keyboard ची निर्मिती झाली. Qwerty कीबोर्ड पेक्षा वेगळे अशा Dvorak कीबोर्ड चा मुख्य हेतू होता की, सर्वात जास्त वापरले जाणारे वर्ण कीबोर्ड च्या मध्यभागी असावीत आणि ह्या कीबोर्ड मध्ये सामान्य शब्दांचा वापर अशा पद्धतीने केला की लगेच लोकांना टाईप करता येतील.

Wireless Keyboard

वायर / केबल असणाऱ्या किबोर्ड च्या विरुद्ध वायरलेस कीबोर्ड. यामध्ये तुम्हाला वायर सिपीयू ला जोडण्याची आवश्यकता भासत नाही. संगणकाला दूर ठेऊन सुद्धा ह्या कीबोर्ड चा वापर केला जातो. ब्लूटूथ किंवा रेडिओ Frequency च्या द्वारे हा कीबोर्ड संगणकाशी जोडला जातो. Wireless Keyboard खूप हलके असतात आणि तुम्ही ह्या कीबोर्ड ला सहजरित्या कुठेही नेऊ शकता.

Ergonomic Keyboard

सामान्य कीबोर्ड वर तुम्ही तासन-तास बसल्यावरती तुमचे हात दुखू लागतात. ह्याच समस्याचे निवारण म्हणून ह्या कीबोर्ड ची निर्मिती केली. ह्या कीबोर्ड वरती तुम्ही आरामात तुमचे हात कीबोर्ड वरती ठेऊन टाईप करू शकता. Ergonomic Keyboard सामान्य कीबोर्ड पेक्षा खूप महाग असतात, त्यामुळे कमी लोक ह्या कीबोर्ड चा वापर करतात.

Azerty Keyboard

19 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात ह्या कीबोर्ड ची निर्मिती फ्रान्स देशात केली. आजपण हा कीबोर्ड फ्रान्स आणि युरोपातील काही देशांमध्ये वापरला जातो.

Gaming Keyboard

हे कीबोर्ड गेमिंग साठी बनवले आहेत. आजच्या युगात गेम्सचा वाढणारा प्रभाव पाहता ह्या कीबोर्डची निर्मिती केली. तस तर हा कीबोर्ड सामान्य कीबोर्ड सारखाच असतो, परंतु ह्या कीबोर्ड वर अतिरिक्त फीचर्स ऍड केलेले असतात. 

Membrane Keyboard

हे कीबोर्ड बाकीच्या कीबोर्ड पेक्षा खूप वेगळे असतात. हे कीबोर्डस खूप कमी किमतीचे असतात, पण ह्या कीबोर्ड वर टायपिंग ची एवढी अचूकता नसते. हा कीबोर्ड गेमसाठी ही सुटेबल नसतो, त्यामुळे खूप कमी लोक ह्या कीबोर्ड चा वापर करतात.

Mechanical Keyboard

ह्या कीबोर्ड वरती प्रत्येक की च्या खाली स्प्रिंग आणि कनेक्टर असतो. त्यामुळे च की दाबल्यावर दरवेळी आवाज येतो. ह्या कीबोर्ड ची विशेषत ही आहे की, हा कीबोर्ड Membrane कीबोर्ड पेक्षा जलद टाईप करतो आणि कमी दरातही भेटतो.

कीबोर्ड बद्दल संपूर्ण माहिती

कीबोर्ड कि चे प्रकार | Keyboard Key Types in Marathi 

आताच्या काळात 80 ते 140 पर्यंत कीज असणारे कीबोर्ड बाजारात उपलब्ध आहेत. त्या सर्व कीज ला पुढील प्रकारामध्ये विभागले जाते. 

वर्ण की (Alphabetical Key)

वर्ण कीज ची संख्या 26 असते म्हणजे A पासून ते Z पर्यंतचे अक्षरे कीबोर्ड वरती असतात. हया कीज मोठ्या लिपीत किंवा लहान लिपीत दोन्ही लिपीत संगणका वर असतात. 

जर तुम्हाला अक्षर मोठ्या लिपीत लिहायचे असेल तर तुम्हाला जे अक्षर लिहायचे आहे त्या अक्षरा अगोदर ‛Caps lock key’ प्रेस करावी आणि जर तुम्हाला छोट्या लिपीत अक्षर टाईप करायचे असल्यास अक्षरा अगोदर ‛Shift key’ प्रेस करावी.

अंक की  (Number Key) 

ह्या किज आपल्या लँपटाँप च्या वरच्या बाजूला आणि कॉम्पुटर च्या डाव्या बाजुला प्रामुख्याने असतात. यांचा उपयोग आपण गणिताशी संबंधित आकडेवारीच्या कामासाठी करत असतो, यामध्ये 0 ते 9 ह्या संख्याना दर्शविले जाते. अंक कि चा वापर करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला न्युम लाँक की चालु करावी लागते. 

कार्य की (Function key)

कार्य की ही कीबोर्ड च्या वरच्या बाजूला स्थित असते. F1 (एफ वन) पासुन F12 (एफ बारा) पर्यत जेवढ्या की किबोर्डवर दिलेल्या असतात त्या सर्व फंक्शन की असतात. वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये ह्या कीजचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.

विशेष की (Special Key)

नवनवीन सॉफ्टवेअरांच्या बद्दलण्याबरोबर कीबोर्ड मध्ये ही बदल होत आहेत. या मध्ये नवनवीन विशेष प्रकारच्या कीज ऍड होत आहेत ह्या कीज विशेष कार्य करण्यासाठी असतात. जसे कि, Space Key, Window Key, Escape Keys.

नियंत्रण की (Control Key)

नियंत्रण कि ह्या बहुतेक वेळा या कीज वरती एकदा टच केल्याने काही बदल होत नाही. आणि जर तुम्ही एका विशिष्ट की बरोबर दुसरी विशिष्ट की टच केली तर संगणकाच्या स्क्रिन वरती बदल दिसून येतो. तसेच ह्या की ला Modifier Keys असेही म्हंटले जाते. जसे कि, ALT KEY, SHIFT KEY, CONTROL KEY. 

सूचक की (Cursor Key)

कर्सर कंट्रोल की ला नँव्हिगेशन की असे देखील म्हटले जात असते. ह्या की चा वापर आपण आपला कर्सर खाली नेण्यासाठी वर नेण्यासाठी डाव्या तसेच उजव्या बाजुला नेण्यासाठी प्रामुख्याने करत असतो.

इंडिकेटर की | Indicator Keys

आपण सर्वसाधारणपणे पाहावयास गेले तर कोणत्याही किबोर्डमध्ये तीन प्रकारच्या इंडिकेटर की दिलेल्या असतात. त्या पुढीलप्रमाणे –

  • न्युम लाँक की

जेव्हा आपण आपल्या लँपटाँप तसेच कंप्युटरच्या किबोर्डवर न्युमरिक की पँड वापरत असतो तेव्हा आपण त्यात न्युम लाँक की चा वापर देखील करत असतो.

  • कँप्सलाँक की

कँप्स लाँक की चा उपयोग आपण एखादे अक्षर म्हणजेच अल्फाबेट कँपिटल मध्ये करण्यासाठी करत असतो.

  • स्क्रोल की

स्क्रोल की आपण कर्सर खाली वर नेण्यासाठी म्हणजेच स्क्रोलिंगसाठी वापरत असतो.


किबोर्ड ची वैशिष्टये | Keyboard Feature in Marathi

  • किबोर्ड हे वायरने जोडलेले तसेच वायरलेस अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध होत असतात.
  • आपल्याला पाहिजे त्या आकाराचे किबोर्ड आपण घेऊ शकतो. कारण वेगवेगळया आकारात आज किबोर्ड बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
  • किबोर्ड हे आपल्यासाठी बाजारात वेगवेगळया ले आऊट मध्ये उपलब्ध असतात. पण आपल्याला प्रत्येकाला जास्तीत जास्त QWERTY लेआऊटच्या किबोर्डचा वापर करणे अधिक पसंद आहे.

कीबोर्ड कशा पद्धतीने काम करतात ? | How do keyboards work?

  • कीबोर्ड ची काम करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
  • प्रत्येक कीज च्या द्वारे सिपीयू ला इलेक्ट्रिक संदेश पाठवला जातो. त्याद्वारे आपल्याला हवे ते अक्षर किंवा संख्या टाईप करता येते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कीबोर्ड वरती आपण जर S टाईप केले तर त्या कीज चा इलेक्ट्रिक संदेश सिपीयू ला जातो आणि आपल्या स्क्रिन वर त्वरित S अक्षर दिसते.
  • कीबोर्ड वरती असणाऱ्या प्रत्येक कीज च्या खाली इलेक्ट्रिक स्विच लावलेला असतो, जेव्हा आपण त्या कीज वरती क्लीक करतो तेव्हा एक ऊर्जा निर्माण होते, जी ऊर्जा फक्त संगणक च समजू शकतो.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

किबोर्डचा फुल फाँर्म काय आहे?

K – Keys
E – Electronic
Y – Yet
B – Board
O – Operating
A – A to Z
R – Response 
D – Directly


अंतिम निष्कर्ष 

अशा प्रकारे आजच्या लेखातुन आपण कीबोर्ड म्हणजे काय? आणि कीबोर्ड चे प्रकार, विविध प्रकारच्या कीबोर्ड कीज याबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहीती समजुन घेतली आहे. 

आम्हाला आशा आहे कि सदर माहीती तुम्हाला नक्की आवडली असेलच तरी तुम्हाला कीबोर्ड बद्दलची माहिती कशी वाटली ह्याबाबतची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि सदर लेख जास्तीत जास्त लोकांपर्यत शेअर करा. 

धन्यवाद !!!

Leave a Reply