NCC Full form in Marathi | NCC म्हणजे काय?

NCC चा फुलफाॅर्म काय आहे

NCC चा फुलफाॅर्म । NCC Full form in Marathi 

NCC चा फुलफाॅर्म “National Cadet Corps” हा आहे, तर NCC ला मराठी भाषेत “राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल” असे सुद्धा म्हटले जाते. 

NCC म्हणजे काय? । NCC Information in Marathi

आज प्रत्येक शाळा तसेच काॅलेजात मुला मुलींची एनसीसी मध्ये भरती केली जाते. जे छात्र एनसीसी गटातील आहेत त्यांना कोणते शस्त्र कसे चालवायचे इत्यादी बाबी अणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येत असते.

एनसीसी मध्ये कवायत तसेच परेड घेतली जाते. सैन्यामधील शिस्त आणि नियम कसे असतात त्याचे काटेकोरपणे पालन कसे करावे हे देखील शिकविले जाते.


NCC ची सुरूवात का झाली?

जे विद्यार्थी महाविद्यालयात शिकत असतात त्यांचे शिक्षणासोबतच देशप्रेम, देशसेवेकडे देखील लक्ष केंद्रित व्हावे देशप्रेमाची सैन्यभरतीची ओढ निर्माण व्हावी 

त्यांना सैन्य दलातील नियम अणि शिस्तबद्धता काय असते हे कळावे म्हणून शाळा महाविद्यालयांमध्ये एनसीसीची सुरूवात करण्यात आली होती. जेव्हा भारतीय सैन्यात लष्कराची कमतरता भासु लागते तेव्हा ती कमतरता भरून काढण्यासाठी एनसीसीला पाचारण केले जाते.

>> BA चा फुल्ल फॉर्म काय आहे संपूर्ण माहिती वाचा

एनसीसी मध्ये छात्रांना जे काही प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते ते महाविद्यालयीन‌ आवारातच दिले जात असते. म्हणुनच सैन्य भरतीमध्ये एनसीसी उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येते. तसेच दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात चौथ्या रविवारच्या दिवशी एनसीसी दिवस साजरा केला जात असतो.


NCC चा मुख्य हेतु कोणता आहे?

NCC चा मुख्य हेतु हा पुढील कालावधीकरीता शस्त्रास्त्रांने प्रशिक्षित सैन्य दल आधीपासुनच निर्माण करून ठेवणे हा एनसीसीचा मुख्य हेतु आहे.

एनसीसीमध्ये भरती झालेल्या सर्व तरूण युवक युवतींना सैन्यात भरती होण्यासाठी पुर्वसज्ज केले जाते.

>> BSC Full Form सविस्तर मराठी माहिती वाचा


NCC जाॅईन करण्यासाठी काय करावे?

एनसीसी हे प्रत्येक शाळा तसेच महाविद्यालयामध्ये उपलब्ध असते फक्त एनसीसी जाॅईन‌ करण्यासाठी आपल्याला शारीरिक क्षमता पडताळणी आणि इतरहि काही शारीरिक चाचण्या पूर्ण कराव्या लागतात, 

या चाचण्या मध्ये आपण पास झालो तर आपल्याला NCC मध्ये प्रवेश मिळून जाईल. 

NCC मध्ये भरती होण्यासाठी किती उंची असणे आवश्यक आहे?

एनसीसी मध्ये छात्रांना भरती करत असताना सर्वप्रथम त्यांची उंची देखील चेक केली जाते कारण ह्याच एन सीसी मधील छात्रांना पुढे जाऊन सैन्य दलात प्रवेश करता येत असतो.

पुरूषांची उंची ही एनसीसी भरतीसाठी साधारणत १५७.५ सेंटीमीटर अणि स्त्रियांची उंची ही एनसीसी भरतीसाठी १५२ सेंटीमीटर इतकी असणे आवश्यक आहे.


NCC मध्ये प्रवेश घेण्याचे फायदे

  • एनसीसी ट्रेनिंग दरम्यान आपणास अनेक सामाजिक कार्य करावी लागतात ही सर्व कार्य केल्याने आपल्या मधील लीडरशीप स्कील आत्मसात होते संवाद कौशल्य सुधारते.
  • एनसीसी ट्रेनिंग पुर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना वेगवेगळे सर्टिफिकेट प्रदान केले जातात. हया सर्टिफिकेटसचा उपयोग आपण शासकीय नोकरी प्राप्त करण्यासाठी करू शकतो.

>> ITI म्हणजे काय आणि याचा फुल्ल फॉर्म काय आहे?

  • NCC सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर राज्य अणि केंद्र सरकारकडुन ज्या नियुक्त्या केल्या जातात, त्यामध्ये या एनसीसी उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाते.
  • ज्या उमेदवारांकडे एनसीसी चे सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी भारतीय सैन्य दलात राखीव जागा असतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न । FAQ 

NCC ची स्थापणा कधी अणि केव्हा करण्यात आली?

एनसीसीची स्थापना १६ एप्रिल १९४८ रोजी हदयनाथ कुंजर यांच्या नेतृत्वाखाली झाली, पण एनसीसी ची स्थापण झाल्याची अधिकृत घोषणा ही १५ जुलै १९४८ रोजी करण्यात आली.

NCC चे मुख्य कार्यालय कोठे आहे?

एनसीसीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

NCC चा फुलफाॅर्म काय आहे? 

NCC चा फुलफाॅर्म National Cadet Corps म्हणजेच राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल हा आहे. 

NCC चे ब्रीद वाक्य काय आहे?

NCC  चे ब्रीद वाक्य “एकता आणि कर्तव्य” “एकता आणि शिस्त” तसेच “कर्तव्य, एकता आणि शिस्त” हे आहे. एनसीसी चा झेंडा हा लाल आकाशी अणि निळ्या या तिन्ही रंगांचा मिळुन बनविण्यात आला आहे. 


निष्कर्ष । NCC Meaning in Marathi

एनसीसी मध्ये भरती झालेल्या उमेदवारांना सैन्य भरतीचे कुठलेही ब़ंधन लादले जात नसते, ज्याला पुढे जाऊन सैन्यात भरती व्हायचे आहे तो होऊ शकतो किंवा नाही झाले तरी चालते. एनसीसी बी किंवा सी सर्टिफिकेट असलेल्या कॅडेट्सना शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये सीडीएसच्या लेखी परीक्षेला बसण्याची गरज नाही.

अश्या प्रकारे NCC बद्दल सविस्तर मराठी माहिती जाणून घेतली आहे, आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील माहिती समजलीच असेल. 

धन्यवाद!! 

Leave a Reply