ChatGpt म्हणजे काय? | ChatGpt in Marathi

ChatGpt म्हणजे काय

चॅट जीपीटी (ChatGPT) चा फुल फॉर्म Chat Generative Pre-trained Transformer (चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) असा होतो. चॅट जीपीटी हे OpenAI या कंपनीने विकसित केले आहे.

OpenAI हि एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच (AI) वर रिसर्च करणारी कंपनी आहे, चॅट जीपीटी या टूल ला गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये लाँच करण्यात आले, तेव्हा या टूल ची एवढी चर्चा झाली नाही पण आता काही दिवसात एकदम सगळीकडे चॅट जीपीटी ची चर्चा सुरु झाली.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या ChatGPT काय आहे? याबद्दल माहिती असेल पण बऱ्याच लोकांनी ChatGPT हे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल. म्हणूनच आज आपण ब्लॉग पोस्ट साठी एक युनिक विषय निवडला आहे. 

तर चला जाणून घेऊया ChatGPT बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती मराठी भाषेतून.  

ChatGpt म्हणजे काय? | ChatGpt Meaning in Marathi 

ChatGPT हा एक चॅटबॉट टूल आहे जो एलोन मस्क यांची भागीदारी असलेली कंपनी OpenAI या आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च कंपनीने विकसित केला आहे. सध्या इंटरनेट विश्वात चॅट जीपीटी ची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

हा एक प्रकार चा कृत्रिम बुद्धिमत्ता चॅट बॉट आहे, ज्याला 30 नोव्हेंबर 2022 ला लाँच केले होते. ते इंटरनेटच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅट बॉट टूलचे रूप आहे जो की गूगलला बऱ्याच गोष्टींमध्ये टक्कर देत आहे.

चॅट जीपीटी मध्ये तुम्ही एखादा प्रश्न विचारला कि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लिखित स्वरूपात मिळते. यात प्रश्नांची उत्तरे देणे, गणिताची समीकरणे सोडवणे, मजकूर लिहिणे, डीबग करणे आणि कोड निश्चित करणे, भाषांमधील भाषांतर करणे, मजकूर सारांश तयार करणे, शिफारसी करणे, गोष्टींचे वर्गीकरण करणे इत्यादी भिन्न कार्ये केल्या जातात. 


चॅट जीपीटी चा वापर कसा करावा? | How to Use ChatGpt in Marathi

चॅट जीपीटी वापरण्यासाठी तुम्हाला त्यात तुमचे खाते तयार करावे लागेल, त्यानंतर तुम्ही चॅट जीपीटी वापरू शकता. सध्या तुम्ही चॅट GPT चा पूर्णपणे मोफत उपयोग करू शकता, परंतु भविष्यात ही सेवा सशुल्क होऊ शकते.

चॅट जीपीटी वापरण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया फॉलो करावी लागेल. 

  1. सर्वप्रथम तुमच्या वेब ब्राउझरमध्ये Chat.Openai.Com वेबसाइट वर जावे तसेच गूगल सर्च इंजिन मध्ये “Chat GPT” सर्च करून देखील या साईट वर जाऊ शकता.
OpenAI साईट होमपेज

2. येथे तुम्हाला लॉगिन आणि साइन अप असे दोन पर्याय दिसतील, तुम्हाला साइन अप वर क्लिक करावे लागेल.

ChatGpt मध्ये साइन अप करणे

3. तुम्ही ईमेल पत्ता, मायक्रोसॉफ्ट खाते किंवा Gmail आयडी वापरून चॅट जीपीटी मध्ये खाते तयार करू शकता. Gmail ID सह ChatGPT मध्ये खाते तयार करण्यासाठी Continue with Google वर क्लिक करा.

ChatGpt खाते तयार करणे

4. यानंतर तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये तुमचे नाव टाकावे लागेल आणि नंतर तुमचा फोन नंबर टाका आणि Continue वर क्लिक करा.

5. तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, OTP टाकून पडताळणी करा.

6. फोन नंबर ची खात्री झाली की तुमचे खाते चॅट जीपीटी मध्ये यशस्वीरित्या तयार केले जाईल आणि नंतर तुम्ही ते वापरू शकता.

7. तसेच आता आपण चॅट जीपीटी वर साइन अप करून घेतले आता आपल्याला प्रश्न विचारून उत्तर घ्यायचे असेल तर स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्या प्रमाणे आपला जो काही प्रश्न असेल तो सर्च बॉक्स मध्ये टाईप करून घ्यावा आणि त्या प्रश्नाच्या समोरील आयकॉन वर क्लिक करावे.

ChatGpt मध्ये प्रश्न विचारा

8. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर लिखित स्वरूपात मिळून जाईल. पुढील स्क्रीनशॉट मध्ये दिल्या प्रमाणे तुमचे उत्तर मिळेल.

ChatGpt मध्ये प्रश्नाचे उत्तर

अश्या प्रकारे आपण ChatGpt चा वापर करू शकतो.

>> आणखी माहिती वाचा – डेटा सायन्स या बद्दल सविस्तर माहिती


ChatGPT  चे फायदे | Benefits of ChatGPT in Marathi

ChatGPT मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लगेचच मिळतात. चॅट जीपीटी वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाहीत, सध्या तुम्‍ही हे विनामूल्य वापरु शकता.

  1. तुम्ही तुमचे शाळा आणि जॉब्सचे काम सहजतेने करू शकता. जसे पत्रलेखन, निबंध, पैराग्राफ, कविता, कोडींग इ.
  2. चॅट जीपीटी वर लोक जेव्हा काही शोधतात, तेव्हा ते त्याला प्रश्न आणि विस्ताराने उत्तरे देतात म्हणजे प्रश्नांची माहिती विस्तृतपणे सांगते हे याचे एक खास असे वैशिष्ठ्य आहे जे याला उपलब्ध असलेल्या इतर AI पासून वेगळं बनवते.
  3. आपण जेव्हा गुगलवर काही शोधतो तेव्हा गुगल शोधलेल्या प्रश्नांशी संबंधित विविध परिणाम दाखवतो पण दुसरीकडे चॅट जीपीटी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नेमक्या शब्दांमध्ये देते.
  4. हे सर्व प्रमुख भाषांना समर्थन देत असल्याने विविध भाषांमध्ये उत्तरे तयार करू शकते. यामुळे चॅटबॉट्सना वापरकर्त्यांशी त्यांच्या पसंतीच्या भाषेत संवाद साधणे शक्य होते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

सोप्या भाषेत ChatGpt काय आहे?

ChatGPT हा एक प्रकारचा कृत्रिम बुद्धिमत्ता चॅट बॉट टूल आहे जो वापरकर्त्यानी विचारलेल्या प्रश्नांची अचूक आणि लेखी उत्तरे देतो. 

चॅट GPT चे संक्षिप्त रूप काय आहे?

चॅट जीपीटी (ChatGPT) चा फुल फॉर्म Chat Generative Pre-trained Transformer (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) असा होतो. 


निष्कर्ष | ChatGPT Information in Marathi

वरील लेखामध्ये आम्ही ChatGPT या युनिक विषयाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, आम्हाला आशा आहे कि तुम्हाला ChatGPT म्हणजे काय? या लेखाबद्दल संपूर्ण माहिती समजली असेलच.

तसेच या लेखाबद्दल तुमचे काही प्रश्न किंवा समस्या असेल तर कंमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही त्या प्रश्नाचे किंवा समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा लेख तुमच्या परिचयातील व्यक्तींना सोशल मीडिया वरती शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा नवनवीन टेकनॉलॉजि बद्दल माहिती मिळेल. 

धन्यवाद !!

Leave a Reply