NSDL चा फुल्ल फॉर्म काय आहे? | NSDL full form in Marathi

NSDL चा फुल्ल फॉर्म काय आहे

NSDL चा फुल्ल फॉर्म काय? या टॉपिक बद्दल आपण माहिती करून घेणार आहोत, जे व्यक्ती स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांना स्टॉक मार्केट बद्दल संपूर्ण माहिती असते त्याच व्यक्तींना NSDL हि संकल्पना माहिती असेल पण ज्या व्यक्तीचा शेअर मार्केट शी दूरदूर काहीच संबंध नाही त्यांना या बद्दल काहीही माहिती नसेल. 

म्हणूनच आज आम्ही या सर्वांच्या माहिती साठी NSDL म्हणजे काय? ते कार्य कसे करते आणि त्याचा उपयोग कश्या प्रकारे होतो? अश्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे पुढील लेखा मधून जाणून घेऊया. 

NSDL चा फुल्ल फॉर्म | NSDL Full Form in Marathi

NSDL चा फुल्ल फॉर्म नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (National Securities Depository Limited) असा होतो. NSDL या डिपॉझिटरी ची स्थापना 1996 मध्ये झाली होती, हि डिपॉझिटरी स्टॉक मार्केट मध्ये शेअर्स ची खरेदी आणि विक्री करण्यासाठी गुंतवणूकदारांना मदत करीत असते. तसेच त्यांनी खरेदी केलेले शेअर्स, बॉण्ड्स आणि डिबेंचर इत्यादी इन्व्हेस्टमेंट सुरक्षित साठवून ठेवण्याचे कार्य हि डिपॉझिटरी करत असते. 


NSDL म्हणजे काय? | NSDL Meaning in Marathi

आपल्या देशामध्ये दोन प्रकारच्या मुख्य डिपॉझिटरी आहेत ते म्हणजे NSDL आणि CDSL. या दोन डिपॉझिटरी मध्ये स्टॉक मार्केट मधील लाखो लोकांचे शेअर्स हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवून ठेवलेले असतात.

NSDL किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड 

CDSL किंवा सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लिमिटेड

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड हि भारतातील पहिली डिजिटल इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीज डिपॉझिटरी आहे. या इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी मध्ये गुंतवणूकदारांचे शेअर्स, बॉंड, डिबेंचर आणि कमर्शियल पेपर्स अश्या विविध प्रकारच्या सेक्युरिटीज ला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुरक्षित साठवून ठेवले जाते.


NSDL कसे काम करते? | How does NSDL work?

NSDL हे एका बँकेप्रमाणेच कार्य करीत असते ज्या प्रमाणे बँकेमध्ये पैसे मुदत खात्यात, बचत खात्यात सुरक्षित साठवून ठेवले जातात अगदी त्याचप्रमाणे नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी मध्ये आपले शेअर्स, बॉण्ड, डिबेंचर हे सुरक्षित साठवून ठेवले जातात. तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड ला IDBI Bank आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज द्वारे मदत केली जाते आणि वेळोवेळी प्रोत्साहन देखील दिले जाते.

NSDL हि डिपॉझिटरी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सेवा पुरविते त्यामध्ये Stocks, Bonds, Debentures, Commercial Papers, Mutual Funds इत्यादी प्रकारच्या सिक्युरिटीज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी NSDL पार पाडते. 

त्याचप्रमाणे NSDL शेअर मार्केट मध्ये विनाकारण होणारा खर्च कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय अमलात आणते आणि भारतीय स्टॉक मार्केट ची सुरक्षितता आणि सुदृढता टिकून ठेवण्यासाठी NSDL महत्वाची भूमिका बजावते. तसचे भांडवली बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी आणि विविध प्रकारच्या ब्रोकर्स यांनी मदत मिळावी म्हणून त्यांनी नवनवीन तंत्रज्ञान चा वापर करणे हे NSDL चे महत्वाचे ध्येय आहे.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

NSDL फुल्ल फॉर्म काय आहे?

NSDL चा फुल्ल फॉर्म National Securities Depository Limited आहे.

भारतात किती डिपॉझिटरी कार्य करत आहेत? 

भारतात मुख्य करून दोन डिपॉझिटरी काम करतात. 
1) NSDL – National Securities Depository Limited
2) CDSL – Central Depository Services (India) Limited


निष्कर्ष | NSDL Information in Marathi

अश्या प्रकारे आपल्याला NSDL चा full form काय आहे आणि नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड कश्या प्रकारे कार्य करते याबद्दल महत्वाची संपूर्ण माहिती जाणून घेतलीच आहे. तर सदर माहिती समजलीच असेल अशी बाळगतो.  

तसेच तुम्हाला वरील माहिती उपयोगाची वाटत असेल तर नक्कीच हा लेख तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी आहे याबद्दल कमेंट करा. 

धन्यवाद !!