Excel म्हणजे काय? | Excel Information in Marathi

Excel म्हणजे काय

संगणक यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतात ज्याद्वारे आपण कामांमध्ये गतिशीलता आणून सुयोग्य पद्धतीने आणि सहज काम पूर्ण करू शकतो. अश्याच प्रकारच्या एका सर्वात महत्वाच्या प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेअर बद्दल आजच्या लेखांमध्ये माहिती बघूया. 

हा प्रोग्रॅम म्हणजे एमएस एक्सेल जो की मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा एक महत्त्वपूर्ण प्रोग्रॅम आहे. या लेखामध्ये आपण MS Excel म्हणजे काय? त्याचा वापर कसा केला जातो आणि त्याचे प्रकार अश्या सर्व प्रकारची माहिती अभ्यासणार आहोत.  

सर्वसाधारणपणे बोलायचे झाले तर (MS Excel) चा वापर हा आकडेवारीच्या स्वरूपात माहिती विश्लेषण व दस्ताऐवज बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Excel म्हणजे काय? | Excel Meaning in Marathi

Excel हा एक अश्या प्रकारचा प्रोग्रॅम आहे ज्यामध्ये आकडेवारीच्या स्वरूपात माहितीचे संकलित करणे, त्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करून विश्लेषण करणे आणि याच सर्व माहितीच्या आधारावर दस्तऐवज तयार करणे म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल होय. हा एक स्प्रेडशीट प्रोग्राम आहे आणि या स्प्रेडशीट, एक्सेल शीट ला वर्कबुक असे देखील म्हटले जाते. 

या एक्सेल प्रोग्रॅम चा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचप्रमाणे सर्व लहान-मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये सर्वात जास्त कार्य हे MS Excel वरच केले जाते. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा एक स्प्रेडशीट प्रकारचा प्रोग्राम असून त्यामध्ये असंख्य स्तंभ म्हणजेच उभे कॉलम्स व असंख्य पंक्ती म्हणजेच आडव्या आणि उभ्या रोज दिलेल्या असतात. त्यामुळे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आकडेवारी संकलित करण्यास मदत होते.

आणखी माहिती वाचाCPU नक्की काय आहे? विस्तृत माहिती वाचा


एक्सेल चा वापर | Uses of Excel

MS Excel हा एक स्प्रेडशीट प्रकारचा प्रोग्राम असल्यामुळे यामध्ये असंख्य स्तंभ आणि असंख्य पंक्ती असतात. त्यामुळे यामध्ये सर्व ऑफिसेस मधील कर्मचाऱ्यांचे डिटेल्स त्याचप्रमाणे अटेंडन्स रेकॉर्ड याच प्रोग्रॅम मध्ये ठेवले जाते आणि तसेच या प्रोग्रॅम मध्ये असलेल्या फॉर्मूल्यांमुळे यामध्ये कर्मचाऱ्यांची सॅलरी शीट सुद्धा बनवली जाते. फायनान्स क्षेत्रामध्ये तर जवळपास 90% आकडेवारी हि MS Excel या साहाय्याने केली जाते. 

त्याचबरोबर मोठमोठ्या कंपन्या किंवा व्यवसाय मालक एक्सेल प्रोग्रॅम चा वापर जमाखर्चाची नोंद करून ठेवण्यासाठी करतात. यामध्ये मुख्यत्वे करून आकडेवारीची गणना केली जाते व ती सर्व माहिती आपल्याला नजरेच्या टप्प्यात ओळखू येण्यासाठी चार्ट किंवा आलेखाच्या स्वरूपात देखील माहितीची मांडणी करू शकतो. 


मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरु कसे करावे

  1. सर्वप्रथम संगणकाच्या स्क्रीनवर असलेल्या Windows या बटनावर क्लिक करा आणि नंतर ऑल प्रोग्रॅम्स मध्ये जाऊन त्यातील MS OFFICE हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 
  2. नंतर तुम्हाला Microsoft Power Point, Microsoft Word, Microsoft Excel, असे पर्याय दिसतील.
  3. त्यातील Microsoft Excel या पर्यायावर क्लिक करून तुम्ही एक्सेल शीट उघडू शकता.
  4. याचबरोबर आणखी एक सोपा पर्याय सुचवायचा झाल्यास माऊस वर लेफ्ट क्लिक करून तुमच्या स्क्रीनवर काही पर्याय तुम्हाला पहावयास मिळतील त्यातील न्यू हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला एम एस ऑफिस मधील सर्व सॉफ्टवेअर प्रोग्रॅम दिसतील. त्यातील मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा पर्याय निवडा. 

अश्या प्रकारे तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर MS Excel हा प्रोग्रॅम ओपन झालेला दिसून येईल. 

आणखी माहिती वाचा – OS म्हणजे काय संपूर्ण माहिती


एक्सेल चे घटक | Excel Factor in Marathi

  1. Workbook

Excel मध्ये तयार केलेली संपूर्ण फाइल म्हणजे Workbook.

उदाहरण:

Sales_Report.xlsx

या Workbook मध्ये एक किंवा अनेक Worksheets असू शकतात

  1. Worksheet

Workbook मधील प्रत्येक स्वतंत्र Sheet ला Worksheet म्हणतात.

उदाहरण:

  • January Sales
  • February Sales
  • March Sales
  • Annual Report

अशा अनेक Worksheets एका Workbook मध्ये ठेवता येतात.

  1. Row म्हणजे काय?

Excel मध्ये आडव्या दिशेने असलेल्या ओळींना Rows म्हणतात.

Rows ला क्रमांक दिलेले असतात:

1, 2, 3, 4, 5...

आधुनिक Excel Worksheet मध्ये जास्तीत जास्त 1,048,576 Rows असतात.

  1. Column म्हणजे काय?

 Excel मध्ये उभ्या दिशेने असलेल्या रकान्यांना Columns म्हणतात.

Columns ची नावे अक्षरांमध्ये असतात:

A, B, C, D...

आधुनिक Excel Worksheet मध्ये 16,384 Columns असतात आणि शेवटचा Column XFD असतो.

  1. Cell म्हणजे काय?

 Row आणि Column ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या छोट्या चौकटीला Cell म्हणतात.

उदाहरणार्थ:

  • A1
  • B5
  • C10
  • D25

ही Cell Addresses आहेत.

समजा Column B आणि Row 5 जिथे भेटतात ती Cell म्हणजे:

B5

यामध्ये आपण Text, Number, Date किंवा Formula लिहू शकतो.

  1. Active Cell म्हणजे काय?

आपण Excel मध्ये ज्या Cell वर सध्या काम करत असतो किंवा जी Cell Select केलेली असते तिला Active Cell म्हणतात.

उदाहरण:

जर C5 Cell निवडलेली असेल तर C5 ही Active Cell आहे.

7. Formula Bar म्हणजे काय?

Excel मध्ये निवडलेल्या Cell मधील Data किंवा Formula पाहण्यासाठी आणि Edit करण्यासाठी Formula Bar वापरला जातो.

उदाहरण:

=SUM(B2:B10)

असा Formula Cell मध्ये असल्यास Formula Bar मध्ये तो Formula पाहता आणि बदलता येतो.

8. Cell Address म्हणजे काय?

प्रत्येक Cell ला एक विशिष्ट Address असतो.

तो तयार होतो:

Column Letter + Row Number

उदाहरण:

A1

इथे:

  • A = Column
  • 1 = Row

म्हणून A1 हा Cell Address आहे.

parts of Excel Excel म्हणजे काय? | Excel Information in Marathi

Excel Formula म्हणजे काय?

Excel मधील Formula म्हणजे गणना करण्यासाठी वापरलेली Expression.

बहुतेक Excel Formula ची सुरुवात = या चिन्हाने होते.

उदाहरण:

=A1+B1

जर A1 मध्ये 100 आणि B1 मध्ये 200 असेल तर Result:

300

मिळेल.

Excel Table म्हणजे काय?

मोठ्या प्रमाणात Data हाताळताना साध्या Range ऐवजी Excel Table वापरणे अधिक सोयीचे ठरते.

उदाहरण:

ProductQuantityPrice
Pen2010
Book1550
Bag5500

या Data ला Table मध्ये Convert केल्यास Sorting, Filtering आणि Formula Management अधिक सोपे होते.

Excel मध्ये Sort आणि Filter म्हणजे काय?

Sort

Data विशिष्ट क्रमाने लावण्यासाठी Sort वापरतात.

उदाहरण:

  • A ते Z
  • Z ते A
  • कमी ते जास्त
  • जास्त ते कमी
  • जुनी Date ते नवीन Date

Filter

मोठ्या Data मधून आपल्याला हवा असलेला Data दाखवण्यासाठी Filter वापरतात.

उदाहरणार्थ, 10,000 ग्राहकांच्या यादीतून फक्त Pune शहरातील ग्राहक पाहायचे असतील तर Filter वापरता येतो.Sort

Data विशिष्ट क्रमाने लावण्यासाठी Sort वापरतात.

उदाहरण:

  • A ते Z
  • Z ते A
  • कमी ते जास्त
  • जास्त ते कमी
  • जुनी Date ते नवीन Date

Excel मध्ये Chart म्हणजे काय?

Data फक्त Table मध्ये पाहण्याऐवजी तो Graph किंवा Chart च्या स्वरूपात दाखवण्यासाठी Excel मध्ये विविध Charts उपलब्ध आहेत.

उदाहरण:

  • Column Chart
  • Bar Chart
  • Line Chart
  • Pie Chart
  • Area Chart
  • Scatter Chart

उदाहरणार्थ, महिन्यानुसार विक्री दाखवायची असल्यास Line Chart वापरून विक्री वाढत आहे की कमी होत आहे हे पटकन समजू शकते.

charts in excel Excel म्हणजे काय? | Excel Information in Marathi

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

एक्सेल मध्ये किती स्तंभ/कॉलम असतात?

एक्सेल या स्प्रेडशीट मध्ये एकूण 16,384 स्तंभ/कॉलम  असतात. 

एक्सेल मध्ये किती पंक्ती/रोज असतात?

एक्सेल या स्प्रेडशीट मध्ये एकूण 1,048,576 पंक्ती/रोज असतात.

Excel चा मुख्य उपयोग काय आहे?

Excel चा वापर Data व्यवस्थित मांडणे, गणना करणे, Analysis करणे, Reports आणि Charts तयार करणे यासाठी केला जातो.


निष्कर्ष | Excel Information in Marathi 

वरील प्रमाणे आम्ही एक्सेल म्हणजे काय? त्याचा वापर अश्या प्रकारची बरीच उपयोगी आणि महत्वाची माहिती दिली आहे तुम्हाला नक्कीच वरील माहिती आवडली असेल अशी आशा करतो. 

आणि तसेच तुम्हाला आणखी कोणत्याही महत्वाच्या विषयाबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कंमेंट करा, आणि या ब्लॉग पोस्ट ला शेअर करायला विसरू नका. 

धन्यवाद!

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. पंकज मिसाळ

    अगदी सोप्या पद्धतीने आपण यात नमूद केले आहेत… 👌🏼