Domain Authority म्हणजे काय? डोमेन अथॉरिटी (DA) कशी वाढवता येईल

डोमेन ऑथोरिटी (DA) म्हणजे काय?

प्रत्येक वेबसाईट आणि ब्लॉग ला सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिळवण्यासाठी SEO (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) सर्वात महत्वाचा मानला जातो. याशिवाय आपण सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिळवुच शकत नाही. म्हणून प्रत्येक ब्लॉगर ला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन बद्दल संपूर्ण ज्ञान असणे खूप गरजेचे असते. 

SEO, बॅकलिंक्स, आणि कीवर्ड रिसर्च याबद्दल पोस्ट पाहल्या आहेत.  तर आज आपण डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच तुम्हाला तुमच्या वेबसाईट ची डोमेन अथॉरिटी कशी वाढवायची आणि कशी चेक करायची याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ही पोस्ट नक्की वाचा. (What is Domain Authority in Marathi and How to improve Domain Authority)


Domain Authority म्हणजे काय? Domain Authority in Marathi

डोमेन अथॉरिटी काय आहे तर, डोमेन म्हणजे आपली वेबसाईट आणि अथॉरिटी म्हणजे प्रतिष्ठा,  म्हणजेच SEO मध्ये असलेली वेबसाईट ची प्रतिष्ठा होय. 

Domain Authority म्हणजेच DA हा एक प्रकारचा SEO स्कोअर आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या वेबसाईट ची सर्च इंजिन मध्ये डोमेन ची असलेली लोकप्रियता समजते. तसेच PA आणि DA जेवढा कमी असतो तेवढी वेबसाईट ची कमी लोकप्रियता असते, आणि DA जास्त असेल तर वेबसाईट रँकिंग साठी खूप मदत होते  

Domain Authority ला Moz या कंपनी ने तयार केले आहे. याचा वापर सर्च इंजिन मध्ये वेबसाईट ची रँकिंग प्रतिष्ठा किती आहे हे तपासण्यासाठी होतो. तसेच 1 ते 100 या संख्येच्या आधारावर वेबसाईट ची डोमेन अथॉरिटी चेक केल्या जाते. 


हे पण वाचा – डोमेन नेम म्हणजे काय?


डोमेन अथॉरिटी कशी वाढवता येईल ! How to Improve Domain Authority

डोमेन अथॉरिटी वाढवण्यासाठी पुढील काही मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

1. लिंक बिल्डिंग

डोमेन अथॉरिटी सुधारन्यासाठी High Quality Backlink घेणे खूप महत्वाचे आहे. एखाद्या जास्त डोमेन अथॉरिटी असलेल्या वेबसाईट कडून बॅकलिंक घेतल्यामुळे आपल्या साईट ची ॲथोरिटी वाढण्याची शक्यता असते.

2. क्वालिटी कन्टेन्ट

वेबसाईट मध्ये ब्लॉग पब्लिश करतांना त्या मधील कन्टेन्ट अतिशय महत्वाचा भाग असतो.  आपल्या ब्लॉग मधील कन्टेन्ट समजायला सोपा असावा. आपण जेवढा विस्तृत ब्लॉग लिहणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार. तसेच वेबसाईट मध्ये नवनवीन आणि सातत्याने पोस्ट करावी आणि कंटेंट अपडेट करावे, त्यामुळे डोमेन ट्रस्ट तयार होतो. 

3. इंटर्नल लिंकिंग

इंटर्नल लिंकिंग मध्ये एका वेबसाईट वरील विविध अंतर्गत पेजेस वर जाण्यासाठी लिंक वापरली जाते. आपण वेबसाईट वर Internal Linking जोडणे महत्वाचे आहे तसेच या मुळे आपल्या ब्लॉग पोस्ट ची पेज ऑथॉरिटी वाढण्यास मदत होते. आपण आपले संबंधित पेजेस इंटरनल लिंकिंग मुळे एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना Easily एका पेज वरून दुसऱ्या पेज वर जाता येते. 


हे पण वाचा – Web Hosting म्हणजे काय?


4. कंमेंट आणि प्रोफाइल लिंक 

आपल्या वेबसाईट च्या विषयाशी संबंधित असलेल्या ब्लॉग वर कमेंट करायला हवी. यामुळे आपल्या वेबसाईट  अथॉरिटी वाढण्यासाठी मदत होते.

5. सोशल मीडिया मार्केटिंग 

सोशल मीडिया च्या साहाय्याने DA वाढण्यासाठी मदत होते. सोशल मीडिया वर आपण आपल्या वेबसाईट ब्लॉग ला शेअर आणि प्रमोट करत असतो. त्या मधून आपल्या ब्लॉग वेबसाईट वर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येऊ शकते.

6. वेबसाईट स्पीड

वेबसाईट लोडींग स्पीड हा एक महत्वाचा रँकिंग फॅक्टर आहे. Domain Authority वाढविण्यासाठी वेबसाईट स्पीड ला खूप महत्व आहे. जेवढा वेबसाईट लोडींग स्पीड जास्त त्यानुसार सर्च इंजिन मध्ये पेज रँक वाढू शकते 

त्याचप्रमाणे वेबसाईट चा Bounce Rate कमी करावा, चुकीच्या असलेल्या Backlink काढून टाकाव्या, या सर्व मुद्द्यांच्या साहाय्याने DA म्हणजेच Domain Authority वाढवता येईल.


डोमेन अथॉरिटी चेक करणे | How to Check Domain Authority

Domain Authority ला SEO कंपनी MOZ तयार केले आहे. तर आपण Moz च्या डोमेन अथॉरिटी टूल्स चा वापर करून डोमेन अथॉरिटी चेक करू.

* सर्वात प्रथम Moz चा डोमेन अथॉरिटी चेकर टूल्स ओपन करून घ्यावा.

 डोमेन अथॉरिटी कशी वाढवायची

* यानंतर दिलेल्या चौकटीत वेबसाईट ची URL ॲड करावी आणि Analyze Domain या पर्यायावर क्लिक करावे. 

* त्यानंतर आपल्याला त्या वेबसाईट चा DA आणि PA स्क्रीनवर दिसेल.

 डोमेन अथॉरिटी कशी चेक करायची

अशा प्रकारे डोमेन अथॉरिटी चेकर टूल्स मध्ये आपण कोणत्याही वेबसाईट ची डोमेन अथॉरिटी, PA म्हणजे पेज अथॉरिटी, बॅकलिंक्स आणि रँकिंग कीवर्ड ही सर्व माहिती जाणून घेऊ शकतो.


निष्कर्ष: डोमेन अथॉरिटी संपूर्ण माहिती

या ब्लॉग मध्ये आपण Domain Authority म्हणजे काय? डोमेन अथॉरिटी कशी वाढवली जाते आणि डोमेन अथॉरिटी चेक कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आम्ही केले आहे.

जर तुम्हाला आमच्या पोस्ट बद्दल काही समस्या असेल तर नक्की कळवा आणि जर काही सूचना असतील तर कमेंट मध्ये कळवा. तसेच आमचा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.

तसेच आम्ही आणखी कोणत्या विषयावर पोस्ट लिहायला हवी हे सुद्धा कळवा. 

🙏तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!🙏

Leave a Reply